वाहन चालकांना लुटणारी कोपरगावची टोळी गजाआड

एलसीबीची कामगिरी: दुचाकी, मोबाईल जप्त
वाहन चालकांना लुटणारी कोपरगावची टोळी गजाआड

अहमदनगर|Ahmedagar

नगर-मनमाड महामार्गावर वाहन चालकांवर धारदार हत्याराने वार करून त्यांना लुटणार्‍या कोपरगावच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली.

समीर उमर कुरेशी (वय 19) सोहेल जावेद पठाण (वय 18 दोघे रा. सुभाषनगर, धारणगाव रोड, कोपरगाव), सौरभ रामदास सातोटे (वय 18 रा. सुभाषनगर, धारणगाव रोड, कोपरगाव, हल्ली रा. समतानगर, नाशिक रोड, नाशिक) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

19 सप्टेंबरच्या रात्री उंकार ऊर्फ अर्जुन शंकरलाल मेवाडा (रा. मध्यप्रदेश) व त्यांचा मित्र गोकूळसिंग रजपूत यांनी नगर-मनमाड रोडवरील येसगाव फाटा (ता. कोपरगाव) येथील राजस्थानी ढाब्यासमोर त्यांचे टेम्पो उभे केले होते. रात्रीची वेळ असल्याने ते दोघे टेम्पोमध्ये झोपेत असताना चोरट्याने मेवाडा यांच्या खिशात हात घालून पैसे चोरट्याचा प्रयत्न केला असता त्यांनी आरडाओरडा केला. त्यावेळी चोरट्यांनी त्यांच्यावर चाकूने वार केले. त्यांना वाचविण्यासाठी आलेल्या रजपूत यांच्यावरही चोरट्यांनी चाकूने हल्ला केला. याप्रकरणी मेवाडा यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू असताना सदरचा गुन्हा समीर कुरेशी व त्याच्या साथीदारांनी केला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली होती. त्यांनी एक पथक स्थापन केेले. या पथकाने सुरूवातीला कुरेशी याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबूली दिली. त्याच्या दोन साथीदारांना पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणाहून ताब्यात घेत अटक केली. त्यांच्याकडून एक दुचाकी व दोन मोबाईल असा 41 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदरची कामगिरी सहायक निरीक्षक सोमनाथ दिवटे, सहायक फौजदार मोहन गाजरे, पोलीस अंमलदार मनोहर गोसावी, बाळासाहेब मुळीक, विशाल दळवी, ज्ञानेश्वर शिंदे, शंकर चौधरी, रवी सोनटक्के, दीपक शिंदे, सागर ससाणे, जालिंदर माने, मेघराज कोल्हे, रणजित जाधव, राहुल सोळुंके, बबन बेरड यांच्या पथकाने केली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com