कुख्यात टोळीचा सदस्य चव्हाण जेरबंद

श्रीगोंदा पोलिसांची पेडगावमध्ये कारवाई
कुख्यात टोळीचा सदस्य चव्हाण जेरबंद
जेरबंद

श्रीगोंदा |प्रतिनिधी| Shrigonda

नगरसह बीड जिल्ह्यात खून व दरोडे प्रकरणातील कुख्यात टोळीचा सदस्य असणारा अट्टल दरोडेखोर

आकाश उर्फ राजेंद्र हाम्या चव्हाण (वय28 वर्षे) रा. वडघुल ता. श्रीगोंदा याला श्रीगोंदा पोलिसांच्या शोध मोहिमेत तपास पथकाने सापळा रचून जेरबंद केले. खतरनाक गुन्हेगार ताब्यात आल्याने ही श्रीगोंदा पोलिसांची मोठी कामगिरी मानली जात आहे.

याबाबत माहिती अशी, नगर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 2003 साली खुनाचा आरोपी अद्यापपर्यंत फरारी असलेला अट्टल गुन्हेगार आकाश चव्हाण हा पेडगाव शिवारात आला असल्याची माहिती श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांना मिळाली. तात्काळ ढिकले यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या अधिकारी व कर्मचार्‍यांचे पथक पाठवून कारवाईच्या सूचना दिल्या.पथकाने सापळा रचून आरोपीला जेरबंद केले. त्यास विश्वासात घेऊन अधिक विचारपुस केली असता त्याने सदर गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. आरोपीवर नगर तालुका पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल आहे. याबरोबरच श्रीरामपूर पोलीस ठाणे, पाटोदा,केज पोलीस ठाणे जिल्हा बीड येथे गंभीर चोरी व दरोड्याचे गुन्हे दाखल आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com