एका मतिमंद तर दुसर्‍या अल्पवयीन मुलीवर अत्याचार
सार्वमत

एका मतिमंद तर दुसर्‍या अल्पवयीन मुलीवर अत्याचार

गुन्हा दाखल, आरोपींना अटक

Arvind Arkhade

अकोले |प्रतिनिधी| Akole

तालुक्यातील ब्राम्हणवाडा येथे एका मतिमंद मुलीवर अत्याचार करून गर्भवती केल्याची तर खिरविरे येथे 16 वर्षीय अल्पवयीन मुलीस पळवून नेऊन अत्याचार केल्याच्या दोन घटना अकोले तालुक्यात घडल्या आहेत. याबाबत अकोले पोलीस ठाण्यात आरोपींविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेतील आरोपींना पोलिसांनी गजाआड केले आहे.

ब्राह्मणवाडा गावच्या हद्दीत मुळ वेहरे परिसरातील मतिमंद मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, दि. 1 जानेवारी 2020 ते दि. 16 ऑगस्ट 2020 या कालावधीत फिर्यादीच्या राहत्या घरात आरोपी पप्पू रंगनाथ फलके (रा. ब्राह्मणवाडा, मूळ वेहरे) याने फिर्यादीची 32 वर्षीय मतिमंद मुलगी मतिमंद असल्याचा फायदा घेऊन तिचेवर तिला धमकी देऊन वारंवार शारीरिक संबंध ठेवून तिला गर्भवती केले. या फिर्यादीवरून अकोले पोलिसांनी अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी पप्पू रंगनाथ फलके याच्या विरोधात गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली आहे.

दुसर्‍या घटनेबाबत खिरविरे येथील 16 वर्षीय अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, दि. 4 ऑगस्ट 2020 ते दि. 6 ऑगस्ट 2020 दरम्यान देवा सुभाष सदगीर, सुनीता सखाराम बेनके व अनिल (पूर्ण नाव माहित नाही, सर्व रा. खिरविरे) यांनी अल्पवयीन फिर्यादी मुलीला तिचे मोटारसायकलवरून जात असताना अपहरण करून भैरुनाथाच्या मंदिराजवळ तसेच शहापूर, कल्याण येथे नेऊन आरोपी देवा सुभाष सदगीर याने तिच्यावर बळजबरीने वारंवार शारिरीक अत्याचार केला व कुणाला काही सांगितले तर आई-वडिलांना मारून टाकेन अशी धमकी दिली.

आरोपी सुनीता सखाराम बेनके व अनिल पूर्ण नाव माहीत नाही यांनी आरोपीस अपहरण करण्यास मदत केली. या फिर्यादीवरून अकोले पोलिसांनी वरील तिघांविरुद्ध अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सदर आरोपींना पोलिसांनी अटक कली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अरविंद जोंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक ढोमणे करत आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com