सहा गोवंशाना मिळाले कत्तलीपासून जीवदान
सार्वमत

सहा गोवंशाना मिळाले कत्तलीपासून जीवदान

कोतुळमध्ये पिकअपसह 2 लाख 61 हजाराचा ऐवज ताब्यात

Arvind Arkhade

अकोले|प्रतिनिधी|Akole

तालुक्यातील कोतुळ येथे काल मंगळवारी पहाटे 4 वाजेच्या सुमारास सहा गोवंशाना कोतुळ येथून कत्तलीसाठी घेऊन जाताना हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी पकडून त्यांना जीवदान दिले आहे. याप्रकरणी मॅक्स पिकअप चालकाविरोधात अकोले पोलीस ठाण्यात प्राणी छळ प्रतिबद्धक कायदयानव्ये दाखल करण्यात आला आहे.

सफेद रंगाची पीक अप क्रमांक एम. एच. 14 ए. झेड 0096 ही कोतुळ अकोले रोडने भरधाव वेगात जाताना हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना दिसली. ही पिकअप कोतुळ येथील दत्त मंदिराजवळ किरण जाधव, अजय खरात, भागवत खोल्लम, गोकुळ साबळे, अमोल येवले, भारत चव्हाण यांनी थांबवली.

पिकअप मध्ये एक खिलारी बैल, तीन जर्शी गायी आणि 2 गावरान गायी दाटीवाटीने कोंबून भरलेल्या दिसून आल्या. पिकअप् चालक बुफरान अजीज सय्यद ( रा. कोतुळ) याच्याकडे चौकशी केली असता त्याने ही गोवंश कुरण येथील कत्तलखान्यात नेत असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याने तेथून पळ काढला. कार्यकर्त्यांनी पाठलाग करून ती पकडली. पिकअप वन्यजीव संस्थेने अकोले पोलीस ठाण्यात आणली.

याप्रकरणी किसन दत्तात्रय जाधव रा. कोतुळ यांच्या फिर्यादी वरून पिकअप् चालक बुफरान अजीज सय्यद याच्या विरोधात प्राणी छळ प्रतिबंध कायदा कलम 3,11, व महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम कलम 5,5 (अ) 9 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस नाईक गोधे हे करत आहेत.

पकडण्यात आलेले सर्व गोवंश वन्यजीव संवर्धन गौशाळेत बोरी येथे सुखरूप सोडण्यात आले. याकामी बजरंग दल कोतुळ शाखा अध्यक्ष किरण जाधव,वन्यजीव संवर्धन संस्था कोतुळ संजय टिकेकर, गोकुळ साबळे, भागवत खोल्लम,बजरंग दल शहर अध्यक्ष भारत चव्हाण,माजी जिल्हा प्रमुख भाऊसाहेब चव्हाण,मनसे तालुका अध्यक्ष दत्ता नवले, शिवनेरी प्रतिष्ठाण कार्याध्यक्ष अमोल येवले, विश्वहिंदू परिषद संदीप रसाळ,एस टी महामंडळ कर्मचारी संघटना अध्यक्ष जयसिंग बोर्‍हाडे, बजरंग दल तालुका अध्यक्ष विनायक साबळे, महेश पवार,अजय खरात, प्रसाद टिकेकर, संकेत खरात, किरण जाधव, आदित्य पवार आदी गोरक्षकांनी परिश्रम घेतले.

Deshdoot
www.deshdoot.com