अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

प्रवाशाचे अपहरण करून लुट करणार्या एकास जिल्हा न्यायालयाने दोषी ठरवत 7 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे.

अतुल विक्रम वाघमारे (वय 30 रा. शिवाजीनगर जि. बीड) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. जिल्हा न्यायाधीश आर. एम. नातु यांनी हा निकाल दिला.

राजेश प्रकाश साळवे यांना 25 नोव्हेंबर 2015 रोजी रात्री 11 वाजता माळीवाडा बस स्थानकावरून अतुल वाघमारे व इतर सहा जणांनी तवेरा गाडीत बसविले. औरंगाबाद येथे सोडतो म्हणत आरोपींनी साळवे यांना मारहाण करून त्यांच्याकडील 2 लाख 57 हजार 900 रूपयांचे सोन्याचे दागिणे, 1 हजार 400 रूपयांची रोकड काढून घेत त्यांना वांबोरी फाट्यावर सोडून दिली होते.

अतुल वाघमारे यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. सदर खटल्याचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल झाल्यानंतर जिल्हा न्यायाधीश आर. एम. नातु यांच्यासमोर हा खटला चालला. सदर खटल्यामध्ये सरकारी पक्षाच्यावतीने वकील मोहन कुलकर्णी, ए. डी. ढगे यांनी काम पाहिले. त्यांना सहायक फौजदार बी. बी. बांदल, पोलीस हवालदार पी. ए. पाटील यांनी सहकार्य केले.