चितळी येथील शाळेत अल्पवयीन मुलीची छेड, संतप्त पालकांचे धरणे आंदोलन

चितळी येथील शाळेत अल्पवयीन मुलीची छेड, संतप्त पालकांचे धरणे आंदोलन

चितळी | वार्ताहर

येथील एका अल्पवयीन मुलीची त्याच शाळेत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलाने वर्गात जावून छेड काढल्या प्रकरणी संतप्त झालेल्या जमावाने शाळेत जाऊन धरणे आंदोलन केले.

श्रीरामपूर तालुका पोलिसांच्या आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले, मात्र तो पर्यंत चितळी स्टेशन परिसरातील व्यापारी वर्गानी आपले दुकाने बंद ठेवून घडलेल्या घटनेचा निषेध व्यक्त केला. तसेच चितळी गाव व स्टेशन परिसरात पोलिसांच्या आशीर्वादाने फोफावलेले अवैध धंदे या घटनेला कारणीभूत ठरत असल्याचे चर्चा दिवस भर गावात रंगली होती.

सविस्तर माहिती अशी की, चितळी (ता.राहाता) येथील हायस्कुल मध्ये इयत्ता नववीमध्ये शिकणारा अल्पवयीन आरोपीने दहावीत शिक्षण घेत असलेली अल्पवयीन मुलीच्या वर्गात जावून तिची छेड काढली. झालेल्या प्रकाराने ही विदयार्थी घाबरून गेली, झालेला प्रकार घरी समजल्यानंतर पीडित मुलीच्या कुटुंबाने श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात सदर आरोपी विरुद्ध फिर्याद दाखल केली आहे.

दरम्यान या घडलेल्या घटनेचा निषेध व आरोपीने चार दिवसा पूर्वी शाळेत दुसऱ्या एका अल्पवयीन मुलीशी गैर वर्तन केले होते. त्यामुळे त्यास शाळेतून काढून टाकावे व लवकरात लवकर अटक करून कारवाई होण्याकरिता परिसरातील जळगाव, एलमवाडी, धनगरवाडी तसेच परिसरातील पालक व नागरिक मोठ्या संख्येने शाळेच्या प्रागणात जमा झाले होते. यावेळी उपस्थित ग्रामस्थांच्या वतीने पो.नि. शिंदे, सहाय्यक पो.नि.अमृत बोरसे यांनी निवेदन स्वीकारून शाळेच्या वेळेत पेट्रोलिंग करून कायमस्वरूपी पोलीस दूरक्षेत्रासाठी कर्मचारी नेमणूक करण्याचे आश्वासन दिले.

अवैद्य धंद्याचे माहेरघर!

शाळेच्या परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री व मटका आधीचे अड्डे आहेत.राजरोज पणे ते खुले आम चालतात.तेथून विदयार्थी ये जा करत असल्याने त्याचा मोठा परिणाम विद्यार्थ्यां वर होत असून अनेक नागरिकांसह विदयार्थी दारू व मटक्या च्या आहारी गेले आहेत स्थानिक ग्रामपंचायत ने पोलीस प्रशासनास ठराव देऊन ही अद्याप कारवाई झाली नाही.यावेळी उपस्थित नागरिकांनी यावर संताप व्यक्त केला.

पोलीस दूरक्षेत्र नावालाच!

शाळे पासून हाकेच्या अंतरावर पोलीस दूरक्षेत्र आहे. परंतु त्याचा जास्त फायदा फक्त झिरो पोलीसच घेतो. नियमित कर्मचारी फक्त महिन्यात एकदाच कलेक्शनला हजेरी लावत असल्याचे उपस्थित वर्गात चर्चा होती.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com