श्रीरामपुरात गोवंशाचे मांस पकडले; एकाला अटक

श्रीरामपुरात गोवंशाचे मांस पकडले; एकाला अटक

श्रीरामपूर | प्रतिनिधी

श्रीरामपूर (Shrirampur) शहरातील वार्ड नंबर दोनमध्ये (Ward no 2) पोलिसांनी (Police) गोवंशाचे मांस पकडले. या प्रकरणी पोलिसांनी एक व्यक्तीस अटक केली आहे .

पोलीस शिपाई मनोज हिवाळे यांनी याबाबत शहर पोलीस ठाण्यात (Shrirampur police station) तक्रार दिली आहे. वार्ड नंबर दोन भागांमध्ये तीन हजार रुपयांचे गोवंश जातीच्या जनावरांचे गोमांस बिलाल मेहबूब कुरेशी (वय २५, रा. उर्दु शाळेजवळ ,वार्ड नंबर 2) याच्याकडे विनापरवाना विक्री करण्याच्या उद्देशाने मिळून आलयाचे तक्रारीत म्हटले आहे.

पोलिस शिपाई हिवाळे यांच्या तक्रारीवरून गुन्हा रजिस्टर नंबर 543/2021 प्रमाणे महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमाच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिस निरीक्षक संजय सानप यांनी बिलाल कुरेशीला अटक केली असून पुढील तपास पोलिस नाईक जाधव हे करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com