पारनेर : युवकाच्या अपहरण प्रकरणी 3 जणांवर गुन्हा दाखल

पारनेर : युवकाच्या अपहरण प्रकरणी 3 जणांवर गुन्हा दाखल

पारनेर |प्रतिनिधी| Parner

पिंप्री जलसेन (Pimpri Jalsen) येथील आकाश बबन काळे या युवकाला अपहरण (Kidnapping of youth) करून 50 हजार रुपये खंडणी मागितल्या प्रकरणी (case of ransom demand) व लोखंडी गजाने मारून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पारनेर येथील सचिन बाबाजी बोरुडे, अशोक बोरुडे, संग्राम कावरे यांच्यावर पारनेर पोलिसांत गुन्हा दाखल (Parner Police station) करण्यात आला आहे. गेल्या आठवड्याभरापूर्वी पिंप्री जलसेन येथील एक युवकाचा चिंचोली (Chicholi) येथे पठारवाडीच्या (Patharwadi) एका व्यक्तीस मोटरसायकलचा धक्का लागला होता.

सदरचा प्रकार मिटविण्यासाठी आकाश काळे हा सोबत आला होता. याचा राग मनात धरून पिंप्री जलसेन येथील आकाश काळे या युवकाचे इनोव्हा गाडीतून अपहरण करण्यात आले. (The youth was abducted from an Innova vehicle) त्याला काठी व लोखंडी गजाने मारहाण करूण्यात आली. यात त्याचा हात मोडला व त्याच्याकडून 50 हजार रुपये खंडणी मागण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पारनेरचे पोलीस निरीक्षक घनश्याम बळप (PI Ghansham Balap), पोलीस उपनिरीक्षक विजयकुमार बोत्रे (Sub-Inspector of Police Vijay Kumar Botre) यांनी घटनास्थळी भेट देऊन आकाश काळे याला रुग्णालयात दाखल केले.

आकाश काळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पारनेर येथील सचिन बाबाजी बोरुडे, आकाश बोरुडे व संग्राम कावरे यांच्याविरुद्ध अपहरण करून खंडणी मागणे, जीवे मारण्याचा प्रयत्न करणे आदी कलमाखाली गुन्हा दाखल (crime was filed) करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विजयकुमार बोत्रे हे करत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com