पाथर्डी शहरात घरफोड्यांचे सत्र; पाच ठिकाणी चोरटयांनी मारला हात

पाथर्डी शहरात घरफोड्यांचे सत्र; पाच ठिकाणी चोरटयांनी मारला हात

पाथर्डी | तालुका प्रतिनिधी

शहरातील उपनगरत चार ते पाच ठिकाणी घरफोड्या झाल्याने नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. सणासुदीच्या काळात चोऱ्यांचे सत्र वाढत असल्याने पोलिसांसमोर मोठं आवाहन उभा राहिले आहे.

शहरातील विजयनगर,आनंदनगर भागात राहणारे आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष किसन आव्हाड, सागर पोटे, जगन्नाथ बरशिले यांच्या राहत्या घरी तर सुभद्रा भोसले यांनी भाड्याने दिलेल्या भाडेकरूंच्या घरी चोरी झाली आहे.

याबाबत किसन महादेव आव्हाड रा.विजयनगर पाथर्डी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि,(दि ३ नोव्हेंबर ) दिवाळी व भाऊबीजेच्या सणाच्या निमीत्ताने गावी कुटुंबासह गेलो होतो. दि ६ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी घरी आल्यावर हॉलचा लोखंडी दरवाजा व लाकडी दरवाजाचे कुलुप तोडून हॉल मधील कपाटातील सामानाची ऊचकुन केली. कपड्याच्या मध्ये ठेवलेले पैसे व किचन मध्ये स्टीलच्या टिप मध्ये पत्नीच्या साड्यात ठेवलेले सोन्याचे दागिनेही अज्ञात चोरटयांनी लंपास केले आहे.

यामध्ये रोख रक्कम दोन लाख, पाच तोळ्याच्या सोन्याच्या बांगड्या, दोन तोळ्याचे नेकलेस असा एकूण ३,४०,०००/- अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलुप तोडून घरफोडी करून ऐवज पळवला आहे.आव्हाड यांच्या जवळ राहणारे प्रदिप बाबुराव भोसले, सुभद्रा भोसले यांनी भाड्याने दिलेल्या भाडेकरूच्या घरी तसेच सागर रामराव पोटे यांच्या घरीही चोरी झाल्याची माहिती फिर्यादीत नमूद केली आहे.

दरम्यान आनंदनगर येथील जगन्नाथ बरशिले यांच्या बंद घराच्या दरवाज्याचे कोयंडा तोडून अज्ञात चोरटयांनी चोरी केली आहे.बरशिले हे आपल्या कुटुंबासह बाहेर गावी गेले असता त्यांच्या घरातील १० हजार रोख रक्कम तसेच २ तोळ्याचे सोन्याचा ऐवज चोरटयांनी लंपास केले आहे.घरी आल्यांनतर चोरी झाल्याची माहिती बरशिले यांना ७ तारखेला रात्री उशिरा कळाली.दि ५ नोव्हेंबर तारखेच्या रात्री ते ६ नोव्हेंबरच्या पहाटेच्या दरम्यान चोरीच्या घटना घडल्या आहे.चोरीच्या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन रानशिवरे हे करीत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com