हप्त्याची मागणी करत दुकानदाराला मारहाण

बोल्हेगावातील घटना : तोफखाना पोलिसांत गुन्हा दाखल
हप्त्याची मागणी करत दुकानदाराला मारहाण

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

हप्ता द्यावा लागेल, अन्यथा सत्तूर डोक्यात घालेन, अशी धमकी देत दुकानादाराला मारहाण (Threatening to beat the shopkeeper) झाल्याची घटना नगरमध्ये (Ahmednagar) घडली आहे. यासंदर्भात योगेश शिवाजी आव्हाड (वय 36, रा. बोल्हेगाव) यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात (Topkhana Police Station) फिर्याद दिली असून बोल्हेगाव (Bolhegav) परिसरात ही घटना घडली आहे.

आव्हाड यांच्या फिर्यादीवरून आरोपी विजय भगवान कुर्‍हाडे, असीफ कदीर पठाण, अमोल प्रदीप कदम यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला (police filed a case) आहे. याबाबत सविस्तर असे, दि. 8 जुलै रोजी दुपारी 4.30 वाजता व सायंकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान, आरोपी अमोल कदम व विजय कुर्‍हाडे हे आंबेडकर चौक, बोल्हेगाव येथील फिर्यादीच्या चिकन-मटन-माशाच्या दुकानात आले. दुकानातील कामगार नवाज शेख व अन्सार शेख यांना दररोज 500 रुपयांचा हप्ता द्या, तसेच हप्ता नाही दिला तर सत्तूर डोक्यात घालीन, अशी धमकी देऊन त्यांना शिवीगाळ व दमदाटी केली.

तसेच बळजबरीने त्यांच्याकडुन 50 रुपये काढून घेतले. तसेच सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास आरोपी तेथे आले. त्याठिकाणी गर्दीमध्ये उभा असलेला असीफ कदीर पठाण व फिर्यादी आव्हाड यांच्यावर आरोपी कुर्‍हाडे यांना कोयत्याने मारण्याची धमकी (Threatened) दिली. तसेच आव्हाड यांच्या हातावर कोयत्याने वार केला. त्यानंतर आरोपींनी आव्हाड यांना लाथाबुक्यांनी मारहाण (Beating) करुन शिवीगाळ करुन आरोपी अमोल कदम याने खिशातील 700 रुपये काढुन घेतले. त्यानंतर आरोपी पळून जावू लागले असता त्यांना तेथे जमलेल्या लोकांनी अमोल कदम यास पकडले. तसेच गर्दीचा फायदा घेऊन कुर्‍हाडे कोयता घेऊन पळून गेला.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com