बायकोला विळीने मारहाण; पतीविरुद्ध गुन्हा दाखल

कुठे घडली घटना?
बायकोला विळीने मारहाण; पतीविरुद्ध गुन्हा दाखल

श्रीरामपूर l प्रतिनिधी

घरातील किरकोळ कारणावरून पत्नीला भाजी कापण्याच्या विळीने मारहाण केल्याची घटना श्रीरामपूर (Shrirampur) तालुक्यातील कमालपुर (Kamalpur) या गावात घडली. याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात (Police station) पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला

बायकोला विळीने मारहाण; पतीविरुद्ध गुन्हा दाखल
बागायतदारावर पुन्हा हनीट्रॅप, दोन लाखांची खंडणी

कमालपूर येथील फिरोज शेरखान पठाण (वय २४) याने घरगुती कारणावरून त्याची पत्नी शबाना फिरोज पठाण हिला भाजीपाला कापण्याच्या विळीने मारहाण केळी. मारहाणीत शबाना यांच्या डोक्याला दुखापत झाली असून त्यांच्या हाता पायावर मुका मार लागला आहे.

नवरा बायकोचे भांडण सोडवण्यासाठी शबाना यांचे वडील व आई मध्ये पडले असता फिरोज याने त्या दोघांना देखील शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली.

बायकोला विळीने मारहाण; पतीविरुद्ध गुन्हा दाखल
Video : कोपरगावमध्ये भाजप-शिवसेनेचे मटका फोडून आंदोलन

याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार गाडेकर हे करीत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com