
अहमदनगर (प्रतिनिधी)
घराकडे रस्त्याने पायी जाणार्यास दुचाकीवरील दोन अनोळखी इसमांनी लोखंडी रॉडने तोंडावर मारून जखमी केले. ही घटना दि. 5 एप्रिल रोजी बुरूडगाव रोड लगत कचरा डेपोजवळ सायंकाळी साडेपाच वाजता घडली. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तुकाराम झेंडे चव्हाण (वय 46, रा. बुरूडगाव रोड) असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, बुरूडगाव रोड येथून चिकन घेऊन रस्त्याने पायी चालत घरी जात असताना कचरा डेपोजवळ समोरून एका काळ्या रंगाच्या दुचाकीवर दोन अनोळखी इसम आले.
त्यांनी दुचाकी थांबवून दुचाकीवर पाठिमागे बसलेल्या इसमाने त्याच्या हातातील लोखंडी रॉड तोंडावर मारून शिवीगाळ करून तेथून ते पळून गेले. या घटनेचा पुुढील तपास कोतवाली पोलीस करीत आहेत.