दागिने परत मागितल्याने केली मारहाण

चारजणांवर गुन्हा दाखल
दागिने परत मागितल्याने केली मारहाण

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

गहाण (Mortgage) ठेवण्यासाठी दिलेले दागिने ( Jewelry) परत मागितले. याचा राग आल्याने चारजणांनी मिळून लोखंडी पहार व लाथाबुक्क्यांनी मारहाण (Beating) केल्याची घटना दि. 26 मे रोजी राहुरी (Rahuri) तालुक्यातील कोंढवड (Kondhwad) येथे घडली आहे.

गौरव पोपट म्हसे, वय 23 वर्षे, रा. कोंढवड या तरूणाने पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले, दि. 26 मे रोजी दुपारी बारा वाजे दरम्यान गौरव म्हसे व त्याच्या घरातील इतर लोक घरामध्ये होते. त्यावेळी गौरव म्हसे हा त्याच्या चुलत भावाला म्हणाला, तुला बँकेत गहाण टाकण्यासाठी दिलेले दागिने मला परत दे. असे म्हणाल्याचा राग आल्याने चुलत भावाने गौरव म्हसे याला लोखंडी पहारीने मारहाण करून जखमी केले. भांडण सोडविण्यासाठी गौरवचे आई-वडील आले असता त्यांनाही लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. तसेच दमदाटी करून पुन्हा दागिने मागितले तर तुमचे हातपाय काढू, अशी धमकी दिली.

घटनेनंतर गौरव पोपट म्हसे याने जखमी अवस्थेत राहुरी पोलीस ठाणे गाठले आणि फिर्याद दिली. त्याच्या फिर्यादीवरून आरोपी संदीप बाळासाहेब म्हसे, मिनाबाई बाळासाहेब म्हसे, दोघे रा. कोंढवड, ता. राहुरी तसेच भाग्यश्री योगेश वर्पे, योगेश वर्पे दोघे रा. खांबे, ता. संगमनेर या चारजणांवर मारहाण व धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक फौजदार महादेव शिंदे हे करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com