मुलीला नांदायला न पाठविल्याने सासू-सासर्‍याला मारहाण

केडगावातील घटना || जावायासह तिघांविरूध्द गुन्हा
मुलीला नांदायला न पाठविल्याने सासू-सासर्‍याला मारहाण

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

मुलगी नांदायला पाठवित नसल्याने जावयाने सासुरवाडीत येत सासू व सासर्‍याला मारहाण केली. केडगाव उपनगरात ही घटना घडली. याप्रकरणी चंदू विश्वनाथ साठे (वय 50 रा. कांबळे मळा, केडगाव) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

दिलेल्या फिर्यादीवरून साठे यांचा जावई लखन आश्ररू वाल्हेकर, वर्षा माऊली जोगदंड व त्यांची आई (पूर्ण नाव माहिती नाही) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. लखन वाल्हेकर हा पत्नीला मारहाण करत असल्याने ती माहेरी राहत होती. रविवारी सायंकाळी चंदू साठे व त्यांची पत्नी घरी असताना लखन, वर्षा व त्यांची आई तेथे आले व म्हणाले,‘तुमची मुलगी कुठे आहे, तिला नांदायला पाठवा नाहीतर आम्ही तिला लग्नात केलेले दागिने द्या’, फिर्यादी त्यांना म्हणाले,‘मी तिला नांदायला पाठविणार नाही, तुम्ही तिला मारहाण करतात’, असे म्हणताच लखनने त्याच्याकडील पोते उचलण्याचे हुकाने फिर्यादीला मारहाण केली. तसेच तिघांनी फिर्यादीसह त्यांच्या पत्नीला मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी मंगळवारी गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com