
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
सरकारी दवाखान्याच्या बांधकामामध्ये नळ फिटींग करताना ती करण्यास विरोध करून कपाळावर वीट मारून फिटींग करणार्यास जखमी केले. रविवारी दुपारी साडे तीन वाजेच्या सुमारास सावेडी उपनगरातील श्रमिकनगरमध्ये बालाजी मंदिराच्या समोर ही घटना घडली.
शहाजी नामदेव कांबळे (वय 42 रा. गिरमे क्लिनीक शेजारी, निर्मलनगर, सावेडी) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अशोक (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहाजी कांबळे नळ फिटींगचे काम करतात. ते रविवारी दुपारी श्रमिकनगरमधील बालाजी मंदिराच्या समोरील सरकारी दवाखान्याच्या बांधकामामध्ये नळ फिटींगचे काम करत असताना अशोक नावाचा व्यक्ती तेथे आला.
त्याने शहाजी कांबळे यांना फिटींगचे काम करण्यास विरोध करत वीटेचा तुकडा कपाळावर फेकून मारून त्यांना जखमी केले. ‘तु येथे काम करून नको, तु जे काम केले आहे ते ठेवणार नाही’, असे म्हणून त्याने शहाजी यांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.