किरकोळ कारणातून पती-पत्नीवर हल्ला; तिघांविरूध्द गुन्हा

किरकोळ कारणातून पती-पत्नीवर हल्ला; तिघांविरूध्द गुन्हा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

किरकोळ कारणातून पती-पत्नीला शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने व कोयत्याने मारहाण करण्यात आल्याची घटना रविवारी सायंकाळी बोल्हेगाव उपनगरात घडली. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात तिघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रियंका पांडुरंग देडुळे (वय 33 रा. मोरया पार्क, बोल्हेगाव) यांनी फिर्याद दिली आहे. संदीप बोरूडे, सिमा संदीप बोरूडे, ओम बोरूडे (सर्व रा. बोल्हेगाव) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रविवारी सायंकाळी फिर्यादी कामावरून घरी आल्या असता त्यावेळी मागील भांडणाची चर्चा चालू होती. त्या चर्चेत सिमाने फिर्यादी यांचे नाव घेतले. फिर्यादी यांनी त्याचा जाब विचारला असता सिमाने त्यांना शिवीगाळ केली सिमाने मुलगा ओमला बोलावून घेतले. त्याने फिर्यादीवर कोयत्याने हल्ला करून जखमी केले. भांडण सोडविण्यासाठी फिर्यादी यांचे पती पांडुरंग मध्ये आले असता त्यांना लाकडी दांडक्याने मारहाण केली. तुम्ही जर आमच्या नादी लागला तर जीवे ठार मारून टाकील, अशी धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com