दोघांकडून तरूणावर प्राणघातक हल्ला

नगर तालुक्यातील 'या' गावात घडली घटना
दोघांकडून तरूणावर प्राणघातक हल्ला

अहमदनगर|Ahmedagar

तरूणाला जातीवाचक शिवीगाळ करत डोक्यात गज घालून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला.

सचिन बाळासाहेब वाघमारे (वय 32 रा. जेऊर बायजाबाई ता. नगर) असे जखमी तरूणाचे नाव आहे. नगर तालुक्यातील जेऊर बायजाबाई गावामध्ये ही घटना घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सचिन विष्णू ससे (रा. ससेवाडी ता. नगर), आदिनाथ म्हस्के (पूर्ण नाव माहिती नाही, रा. चाफेवाडी ता. नगर) असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. जखमी सचिनचा भाऊ सुनील बाळासाहेब वाघमारे यांनी फिर्याद दिली आहे. सचिन ससे याला अटक करण्यात आली असल्याचे सहायक निरीक्षक युवराज आठरे यांनी सांगितले.

फिर्यादीत म्हटले आहे की, आरोपींनी घरी येऊन सचिन यांना काही एक कारण नसताना जातीवाचक शिवीगाळ केले. कायमचे संपून टाकण्याची भाषा करत अजिनाथ म्हस्के याने गजाने सचिनच्या डोक्यात मारले. सचिन ससे याने दगडाने व लाथाबुक्क्यांनी सचिनला मारहाण केली. नगर ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक अजित पाटील, सहायक निरीक्षक आठरे यांनी घटनास्थळी भेट दिली. पुढील तपास उपअधीक्षक पाटील करीत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com