नगर शहरात ज्वेलर्सवर सशस्त्र दरोडा

सराफ बाजारात दहशतीचे वातावरण
नगर शहरात ज्वेलर्सवर सशस्त्र दरोडा

अहमदनगर (प्रतिनिधी)

शहरातील सराफ बाजार भागातील संतोष वर्मा यांच्या मालकीच्या वर्मा ज्वेलर्स वर आज पहाटे सशस्त्र दरोडा पडला. सकाळी ही घटना उघडकीस आली. पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू केला आहे.

दरम्यान, या दरोड्याच्या प्रकारामुळे सराफ बाजारात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अहमदनगर शहरातील भर वस्तीत सशस्त्र दरोडा पडल्याने व्यापारी हादरून गेले आहेत. पोलिसांनी घटनास्थळावरुन आरोपींच्या हाताचे ठसे घेतले आहेत. ज्वेलर्समोरील सीसीटीव्ही फुटेज मध्ये 7 चोरटे कैद झाले असून तपासासाठी पोलिसांनी स्वतंत्र पथके तयार केली आहेत.

नगर शहरात ज्वेलर्सवर सशस्त्र दरोडा
मनेका गांधींना 'ते' वक्तव्यं भोवल; ISKCON ने पाठवली 100 कोटींची मानहानीची नोटीस

चोरीच्या वाहनाने आलेल्या दरोडेखोरांनी सराफ बाजारातील वर्मा ज्वेलर्सवर सशस्त्र दरोडा टाकला. सहा ते सात दरोडेखोर असल्याचा संशय असून, त्यांच्याकडे धारदार शस्त्र होती. शिवाय गॅस कटर देखील सोबत आणले होते. सातशे ग्रॅम सोने लंपास केले असून, त्याची किंमत चाळीस लाखांच्या आसपास आहे. भरवस्तीत असलेल्या सराफ बाजारात पडलेल्या दरोडामुळे व्यावसायिक हादरून गेले आहे.

नगर शहरात ज्वेलर्सवर सशस्त्र दरोडा
महाराष्ट्राला शिवरायांचे 'वाघ नखं' इंग्लंडकडून फक्त ३ वर्षांसाठी मिळणार, तीसुद्धा कर्जावर?

घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक अनिल कातकडे, कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव दाखल झाले आहेत. श्वान पथकाच्या माध्यमातून तपास सुरू केला आहे. संशयित आरोपींच्या हाताचे ठसे घेण्याचे देखील काम पोलीस प्रशासनाने सुरू केले आहे. दरम्यान फिर्याद दाखल करून घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com