परखतपूरच्या भोलेश्‍वर मंदिरात चोरी

चोरटे सीसीटीव्हीत कैद
परखतपूरच्या भोलेश्‍वर मंदिरात चोरी
चोरी

अकोले (प्रतिनिधी)

अकोले तालुक्यातील परखतपूर रेथील महादेव शिव मंदिरात गुरुवारी रात्रीच्या सुमारास दोन चोरट्यांनी दानपेटी वर डल्ला मारत सुमारे 50 ते 60 हजार रुपये लांबवले असून ग्रामस्थांच्या तक्रारीवरून अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

परखतपूर गावासह पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्रा भोळ्या महादेवाच्या मंदिरात रात्रीच्या सुमारास दोन चोरट्यांनी कटावणीच्या सहाय्याने दानपेटी उचकटून दान पेटीतील पैसे लंपास केले. हे चोरटे दिवसा मंदिराची पाहणी करून रात्रीच्या सुमारास या चोऱ्या यशस्वी करतात असल्याचा संशय ग्रामस्थ व्यक्त करीत आहे.

अकोले तालुक्यात मागील आठवड्यात पडलेला सर्वात मोठा दरोडा, त्यानंतर चोऱ्यांचे जे सत्र सुरू झाले ते थांबता थांबेना. हे चोर जणू काही दररोज नवीन ठिकाणी चोऱ्या करून पोलिसांना आव्हान देत आहे.

शुक्रवारी सकाळी महादेव मंदिराची पूजा करण्यासाठी व दर्शनासाठी गेलेल्या भाविकांनी चोरी झाल्याची घटना निदर्शनास आली. त्यानंतर नागरिकांनी अकोले पोलिसांशी याबाबत संपर्क साधत घटनास्थळी येण्याची विनंती केली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मंदिर परिसराची पाहणी करून पंचनामा करत ग्रामस्थांना धीर देण्याचा प्रयत्न केला.

ग्रामपंचायत मार्फत लावण्यात आलेल्रा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात या चोरीचा प्रकार कैद झाला असून त्याचे चित्रीकरण पोलिसांनी तपासले. यातून काही चोरटे पडण्यास काही अंशी मदत होईल, अशी आशा ग्रामस्थांनी व्यक्त केली.

सीसीटिव्हीतील चित्रफित वरून गावकऱ्यांनी पाहिल्यावर आपापला अंदाज वर्तविला. हे चोरटे लांबचे नसून दिवसा पाळत ठेवूनच रात्रीच्या वेळी डल्ला मारला असल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये होती. ग्रामस्थांच्या म्हणण्यावरून सुमारे 50 ते 60 हजारांची रक्कम या दान पेटीतून चोरीला गेल्याचा अंदाज सरपंच प्रशांत वाकचौरे, अविनाश देशमुख, भारत वाकचौरे रासंह ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.

मंदिरापासून काही अंतरावरच सुगाव हा मुख्य रस्ता आहे. त्यामुळे चोरट्यांना शोधण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे आहे. पोलिस प्रशासनाकडून रात्रीच्या वेळी सुगाव फाटा येथे नाकाबंदी करून रात्रीच्या वेळी तपासणी करण्याची मागणी सुगाव बु.,वाशेरे, मानोहरपुर, कळस, शेकेईवडी, परखतपुर आदी सह परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे. पोलिसांनीही रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी ही जोर धरू लागली आहे.

अकोले पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मिथुन घुगे यांच्याकडे यावेळी पेट्रोलिंग वाढविण्यात यावी अशी मागणी सरपंच प्रशांत वाकचौरे, अविनाश देशमुख, भारत वाकचौरे, योगेश देशमुख, नितीन वाकचौरे, संदीप वाकचौरे, जगन वाकचौरे, सोमनाथ खांडगे यांनी केली. सदर घटनेचा पंचनामा हे. कॉ. के. के. परबत, पो. ना. पटेकर यांनी केला. अधिक तपास पोलिस निरीक्षक घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी आधिकारी ए. जे. घुले हे करीत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com