सव्वा तीन लाख चोरणाऱ्यास २४ तासात अटक

स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी
सव्वा तीन लाख चोरणाऱ्यास २४ तासात अटक

अहमदनगर|प्रतिनिधी|Ahmedagar

मोपेड दुचाकीच्या डिक्कीचे लॉक तोडून त्यातील तीन लाख 30 हजाराची रक्कम चोरून नेणाऱ्या आरोपी....

रमेश रामु कोळी (वय ३२, रा. विजयवाडा रेल्वे स्टेशनजवळ, आंध्रप्रदेश ह. रा. हिनानगर, चिकलठाणा, जि. बुलढाणा) याला २४ तासात पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. दरम्यान त्याच्या सोबतचा अशोक राम गाजवार (रा. विजयवाडा रेल्वे स्टेशनजवळ, आंध्रप्रदेश) हा पसार झाला आहे.

अहमदनगर शहरातील तारकपूर येथील सिटी केअर हॉस्पिटलच्या पार्किंगमध्ये सागर अनिल पवार (वय 30 रा. नेप्ती ता. नगर) यांनी शुक्रवारी दुपारी त्यांची मोपेड पार्क केली होती. यामध्ये तीन लाख 30 हजाराची रक्कम ठेवली होती. त्यांना ती रक्कम त्यांचे नातेवाईक सुनील कांडेकर यांच्या ऑपरेशनसाठी भरायची होती.

दुपारी एक ते अडीच यावेळेत चोरट्यांनी दुचाकी डिक्कीचे लॉक तोडून रक्कम चोरून नेली आहे. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, व नगर शहर उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि अनिल कटके यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सपोनि सोमनाथ दिवटे, पोउनि सोपान गोरे, पोहेकॉ सुनिल चव्हाण, दत्तात्रय हिंगडे, बबन मखरे, संदीप पवार, देवेंद्र शेलार, संदीप घोडके, पोना शंकर चौधरी, ज्ञानेश्वर शिंदे, संतोष लोढे, पोकॉ जालिंदर माने, योगेश सातपुते व चापोहेकॉ बबन बेरड आदींच्या पथकाने २४ तासात आरोपीला अटक केले आहे.

आरोपी कोळी याच्याकडील तीन लाख १५ हजार रुपये, दुचाकी, मोबाईल असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

Related Stories

No stories found.