चाळे चिडीमाराच्या अंगाशी

अल्पवयीन मुलीने उचलले हे पाऊल
चाळे चिडीमाराच्या अंगाशी

अहमदनगर | Ahmedagar

क्लासवरून घरी जाणार्‍या अल्पवयीन मुलीसमोर (Minor girl) चाळे करणार्‍या युवकावर तोफखाना पोलीस ठाण्यात (Tofhkhana Police Station) विनयभंगाचा गुन्हा (crime of molestation) दाखल झाला आहे.

मिनीनाथ दिलीप चव्हाण (वय 24 रा. भिस्तबाग चौक, सावेडी) असे गुन्हा दाखल झालेल्या युवकाचे नाव आहे. पिडीत अल्पवयीन मुलीने फिर्याद दिली आहे. बुधवारी सायंकाळी सावेडी (Savedi) उपनगरात ही घटना घडली.

बुधवारी (Wednesday) सायंकाळी अल्पवयीन मुलगी तिच्या लहान भावासह सायकलवरून घरी जात असताना मिनीनाथ चव्हाण याने त्यांना पाहिले. मुलगी व तिचा भाऊ त्यांच्या घराजवळ पोहचले असता मिनीनाथ त्याच्या दुचाकीवरून तेथे आला.

मुलीजवळ कोणी समजदार व्यक्ती नसल्याचा गैरफायदा घेत मिनीनाथ याने तिच्याशी गैरवर्तन करून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले असल्याचे पिडीत अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. घटनास्थळी शहर पोलीस उपअधीक्षक विशाल ढुमे, पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांनी भेट दिली असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे करीत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com