कुख्यात गुन्हेगार पठारे टोळीविरोधात मोक्का

सहा आरोपींचा समावेश; तोफखान्यात 12 गुन्हे दाखल
कुख्यात गुन्हेगार पठारे टोळीविरोधात मोक्का

अहमदनगर|Ahmedagar

शहरात दहशत निर्माण करणारा कुख्यात गुन्हेगार विजय पठारे टोळीविरोधात मोक्काअंतर्गत (MCOCA) कारवाई करण्यात आली आहे.

कुख्यात गुन्हेगार पठारे टोळीविरोधात मोक्का
Coronavirus : जिल्ह्यात आज ३९३ रुग्णांची नोंद

टोळीप्रमुख विजय राजु पठारे (वय 40), अजय राजु पठारे (वय 25), बंडु ऊर्फ सुरज साहेबराव साठे (वय 22), अनिकेत विजु कुचेकर (वय 22), प्रशांत ऊर्फ मयुर राजु चावरे (वय 24) अक्षय गोविंद शिरसाठ (वय 23 सर्व रा. सिध्दार्थनगर, नगर) यांचा यामध्ये समावेश आहे. या टोळीविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात (Tofhkhana Police Sation) 12 गंभीर गुन्हे दाखल आहेत. या सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील (SP Manoj Patil) यांनी संघटीत गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्काअंतर्गत (MCOCA) कारवाई करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याच्या सुचना पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकार्‍यांना दिल्या आहेत. मागील आठवड्यामध्ये एका टोळीवर मोक्का (MCOCA) अंतर्गत कारवाई करण्यात आलेली होती. त्यामध्ये 9 आरोपीचा समावेश होता.

कुख्यात गुन्हेगार पठारे टोळीविरोधात मोक्का
अर्बन बँक फसवणूक: डॉ. शेळकेसह श्रीखंडे, सिनारे, कवडेंना अटक

विजय पठारे टोळीने नगर शहरात आपली दहशत निर्माण केली होती. बालिकाश्ररोडवर एकाचवेळी दोन दुकानावर दरोडा टाकला होता. यानंतरही एकावर चाकू हल्ला करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न पठारे टोळीने केला होता. पठारेसह त्याच्या टोळीतील इतरांना स्थानिक गुन्हे शाखा व तोफखाना पोलिसांनी अटक केली आहे. या टोळीविरोधात मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात यावी, असा प्रस्ताव तोफखाना पोलिसांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे पाठविला होता. पोलीस अधीक्षक यांच्याकडून सदर प्रस्ताव नाशिकचे (Nashik) विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे मंजूरीसाठी पाठविण्यात आला होता. या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास नगर शहराचे पोलीस उपअधीक्षक विशाल ढुमे करीत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com