‘मोक्का’वाला बाळासाहेब जेरबंद

एलसीबीची पाथर्डी तालुक्यात कारवाई
‘मोक्का’वाला बाळासाहेब जेरबंद

अहमदनगर|Ahmedagar

सोलापूर टोलनाक्यावरील दरोडा व मोक्का गुन्ह्यातील एका आरोपीला शिराळा (ता. पाथर्डी) शिवारात पोलिसांनी अटक केली

सोलापूर टोलनाक्यावरील दरोडा प्रकरणी आठ आरोपीविरोधात मोक्का कलमान्वये कारवाई करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या गुन्ह्यातील पाच आरोपींना यापूर्वी अटक केली आहे. दोन दिवसापूर्वी या गुन्ह्यातील आरोपी विक्रम गायकवाड, बाबा आढाव यांना भिंगार पोलिसांनी नगर तालुक्यातील वाळूंज शिवारात अटक केली होती. यातील एकमात्र आरोपी बाळासाहेब भिंगारदिवे पसार होता. तो पाथर्डी तालुक्यातील शिराळा गावामध्ये आला असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती.

पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गणेश इंगळे, पोलीस कर्मचारी मनोहर शेजवळ, भाऊसाहेब कुरूंद, संदीप घोडके, सुरेश माळी, संतोष लोंढे, जालिंदर माने, चंद्रकांत कुसळकर यांच्या पथकाने भिंगारदिवे याला अटक केली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com