हनीट्रॅप: 'त्या' अधिकार्‍याकडे मागितले होते तब्बल 3 कोटी

अखेर फिर्याद दाखल; तरूणीसह पाच जणांवर गुन्हा
हनीट्रॅप: 'त्या' अधिकार्‍याकडे मागितले होते तब्बल 3 कोटी

अहमदनगर|Ahmedagar

नगर तालुका पोलिसांनी उघडकीस आणलेल्या हनीट्रॅपमध्ये एका क्लासवन अधिकार्‍यास ब्लॅकमेल केल्याचे समोर आले आहे. या अधिकार्‍याने हिम्मत दाखवत तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून ब्लॅकमेलर टोळीतील पाच जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. या अधिकार्‍याकडे तब्बल तीन कोटींची खंडणी ‘त्या’ तरुणीने मागितली होती. दोन कोटी देण्याचे त्या अधिकार्‍याने कबूल केले होते.

त्यातील 80 हजार रुपये त्याने दिले होते. संबंधित तरुणीसह एजंट अमोल सुरेश मोरे, सचिन भिमराज खेसे (रा. हिगंणगाव ता. नगर), सागर खरमाळे, महेश बागले (दोघे रा. नालेगाव, नगर) यांचा आरोपीमध्ये समावेश आहे. सचिन खेसे याला पोलिसांनी अटक केली आहे.

खेसे याने फिर्याद दिलेल्या क्लासवन अधिकार्‍यांची व तरूणीची ओळख करून दिली. त्यानंतर तरूणीने या अधिकार्‍याला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर दोघांमधील नाजूक संबंधाचा व्हीडीओ तयार करण्यात आला. त्या व्हिडीओच्या आधारे धमकावत अधिकार्‍याकडे तीन कोटी रुपयांची मागणी केली. तीन कोटी न दिल्यास पोलिसांना व्हिडीओ दाखवून अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्याचीही धमकी दिली.

हनीट्रॅप: 'त्या' अधिकार्‍याकडे मागितले होते तब्बल 3 कोटी
PUBG Mobile गेम नव्या नावाने, आजपासून नोंदणी सुरु

धमकी आणि व्हिडीओ पाहून भेदरलेल्या अधिकार्‍याने दोन कोटी देण्याची तयारी दर्शविली. ही धमकी देताना अधिकार्‍यांची कारमधील तीस हजार रूपयांची रोकड बळजबरीने काढून घेतली. त्यानंतर बळजबरीने 50 हजार रूपये ऑनलाईन ट्रान्सफर केले. तपासी अधिकारी राजेंद्र सानप यांनी या प्रकरणाचा अत्यंत गोपनीय तपासात या अधिकार्‍याची फिर्याद दाखल करून घेण्यात आली. त्यानंतर खेसे याला अटक केली. त्याच्याकडे विचारपूस करता त्याने आणखी दोघांची (बागले, खरमाळे) यांची नावे पोलिसांनी सांगितली. पोलीस त्यांच्या घरी पोहचले, पण तोपर्यंत ते पसार झाले होते.

पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर अधीक्षक सौरभ अग्रवाल, नगर ग्रामीणचे उपअधीक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप हे अधिक तपास करत आहेत. नगर तालुका पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक आर. एन. राऊत, धनराज जारवाल, पोलीस कर्मचारी बापुसाहेब फोलाणे, संतोष लगड, योगेश ठाणगे, भानुदास सोनवणे, धर्मराज दहिफळे, संभाजी बोराडे यांच्या पथकाने आरोपीला अटक केली.

खरमाळे पोलीस कर्मचार्‍याचा भाऊ

अटक करण्यात आलेला आरोपी सागर खरमाळे हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील एका पोलीस कर्मचार्‍याचा भाऊ आहे. यामुळे ‘त्या’ पोलीसाचा या हनीट्रॅपशी काही संबंध आहे का याची चौकशी पोलिसांनी करणे गरजेचे आहे. गुन्हा दाखल होण्याची कुणकुण आरोपी सागर खरमाळे व महेश बागले यांना लागताच ते नगरमधून पसार झाले. पोलिसांनी त्यांच्या शोधासाठी नाशिकवारी केली. परंतु, ते हाती लागले नाहीत.

हनीट्रॅप: 'त्या' अधिकार्‍याकडे मागितले होते तब्बल 3 कोटी
या लोकांना कोरोना लसीसाठी ९ महिने थांबावे लागणार ? का जाणून घ्या
No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com