कोविड लसीच्या नावाखाली अडीच तोळ्याला गंडा

भरदुपारी घरात घुसून गंठण चोरले
कोविड लसीच्या नावाखाली अडीच तोळ्याला गंडा

अहमदनगर (प्रतिनिधी)

कोविडचा डोस घेतला का? अशी विचारणा करण्यासाठी घरात घुसलेल्या चौघांनी अडीच तोळ्याचे सोन्याचे गंठण चोरून नेले. गुरूवारी दुपारी एक वाजता सिव्हील हाडकोमधील क्रांती चौकात वैष्णवी मंदिराजवळ ही घटना घडली.

या प्रकरणी वत्सला मुरलीधर लाटे (वय 77 रा. सिव्हील हाडको) यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अनोळखी चार जणांविरूध्द घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोविड लसीच्या नावाखाली अडीच तोळ्याला गंडा
Sonam Kapoor : वाढदिवसानिमित्त सोनम कपूरने शेअर केले खास फोटो

वत्सला लाटे गुरूवारी दुपारी घरामध्ये असताना त्यांच्या घराचा दरवाजा कोणीतरी वाजवला. त्यांनी घराचा दरवाजा उघडला असता चार अनोळखी व्यक्ती तेथे होत्या. त्यांनी फिर्यादी यांच्या घरामध्ये प्रवेश केला. त्यांनी फिर्यादी यांच्याकडे कोविडचा डोस घेतला का, कोणत्या तारखेला घेतला, पावती दाखवा, असे प्रश्‍न विचारले.

कोविड लसीच्या नावाखाली अडीच तोळ्याला गंडा
परी म्हणू की सुंदरा! सोनालीचा कुलकर्णीचा मोहात पाडणारा चमचमता लुक एकदा पाहाच

यातील काही व्यक्तींनी फिर्यादी यांच्या घरातील कपाट उघडून कपाटामध्ये ठेवलेले अडीच तोळ्याचे सोन्याचे गंठण चोरून नेले. ते चौघे गेल्यानंतर चोरीचा प्रकार फिर्यादी यांच्या लक्षात आला. त्यांनी तोफखाना पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार रणजित बारगजे करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com