भिंगारच्या जखमी तरूणाचा उपचारादरम्यान मृत्यू

पोलिसांच्या ताब्यात असताना झाला होता जखमी
भिंगारच्या जखमी तरूणाचा उपचारादरम्यान मृत्यू

अहमदनगर|Ahmedagar

पोलिसांच्या (Police) ताब्यात असताना मारहाणीत जखमी झालेल्या आरोपी सादिक लाडलेसाहब बिराजदार (वय- 32) याचा उपचारादरम्यान शुक्रवारी रात्री मृत्यू झाला आहे. त्याच्यावर नगरमधील (Ahmednagar) खासगी रुग्णालयात (Private hospital) उपचार सुरू होते.

आरोपी सादिकला भिंगार कॅम्प पोलीस (Bhingar Camp Police) ठाण्याचे कर्मचारी शेख आणि पालवे ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात घेऊन जात असताना भिंगार नाला परिसरात सादिकला पाच जणांनी मारहाण केली असल्याची फिर्याद सादिकची पत्नी रुक्सार बिराजदारने दिलेली आहे. त्यानुसार पाच जणांविरोधात खूनाचा प्रयत्न कलमान्वये गुन्हा दाखल आहे. मात्र, आरोपी सादिकला पोलीस ठाण्यात घेऊन जात असताना त्याने चालू वाहनातून उडी मारली असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. पोलीस कर्मचाऱ्याने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी सादिकविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेत सादिकच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर उपचारासाठी त्याला शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान सादिकचा मृत्यू झाला आहे. सादिकचा मृत्यू झाल्याची माहिती समजताच अपर पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, श्रीरामपूरचे उपाधीक्षक संदीप मिटके, नगर शहर विभागाचे उपाधीक्षक विशाल ढुमे, तोफखाना पोलीस ठाण्याच्या निरीक्षक ज्योती गडकरी, कॅम्प पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक शिशिरकुमार देशमुख आदी रूग्णालयात दाखल झाले होते. रूग्णालय परिसरात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. झोपडी कॅन्टीनकडून तोफखाना पोलीस ठाण्याकडे जाणारा रस्ता दोन्ही बाजूने बंद करण्यात आला होता. दरम्यान मयत सादिक याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पुणे येथे पाठविण्यासाठी रात्री उशिरापर्यंत हालचाली सुरू होत्या.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com