थकीत पाणीपट्टीची मागणी करणार्‍या ग्रामसेविकेला मारहाण

कुठे घडली घटना?
थकीत पाणीपट्टीची मागणी करणार्‍या ग्रामसेविकेला मारहाण

अहमदनगर|Ahmedagar

थकीत पाणीपट्टी बिलाची (Exhausted water bill) मागणी करण्यासाठी गेलेल्या महिला ग्रामसेविकेच्या कानफटीत लावत शिवीगाळ व धक्काबुक्की करण्यात आली.

थकीत पाणीपट्टीची मागणी करणार्‍या ग्रामसेविकेला मारहाण
Coronavirus : जिल्ह्यात आज चारशेहून अधिक रुग्णांची नोंद

नगर तालुक्यातील घोसपुरी (Ghospuri) गावात ही घटना घडली. या प्रकरणी दोन महिलांविरोधात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा नगर तालुका पोलीस (Nagar Police) ठाण्यात दाखल केला आहे. रिजवान वसीम शेख, जकीया अकलाक शेख (दोघी रा. घोसपुरी) अशी गुन्हा दाखल झालेल्या महिलांची नावे आहेत. घोसपुरीच्या ग्रामसेविका जयश्री एकनाथ चितळे (वय 40 रा. भिंगार) यांनी फिर्याद दिली आहे.

ग्रामसेविका चितळे या ग्रामपंचायत कर्मचार्‍यांसह घोसपुरी गावातील फकीर मोहमंद बाबुभाई शेख यांचेकडे थकीत पाणीपट्टी बिलाची वसूली करण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी तेथे असलेल्या रिजवान व जकीया यांच्याकडे चितळे यांनी थकीत पाणीपट्टी बिलाची मागणी केली. तसेच थकीत पाणीपट्टी बील न भरल्यास नळ कनेक्शन कट केले जाईल, अशी तोंडी समज चितळे यांनी दिली. तेथे असलेला अकलाक शेख याने चितळे यांच्या तोंडासमोर मोबाईल धरून शुटींग काढण्यास सुरूवात केली असता चितळे यांनी तो मोबाईल बाजुला केला. तेव्हा रिजवान हिने चितळे यांच्या कानफटीत मारून हिंमत असेल तर नळाला हात लावून दाखव, असे म्हणत शिवीगाळ व दमदाटी केली. यानंतर जकीया हिने चितळे यांच्याशी झटापट करून ‘नल को तो हात लगाके दिखा, असे म्हणून शिवीगाळ, दमदाटी करत चितळे व त्यांचे कर्मचारी करत असलेल्या सरकारी कामात अडथळा निर्माण केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रितेश राऊत करीत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com