
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
धक्का लागून दुचाकी पडल्याने मुलीला मारहाण करून तिच्या वडिलाच्या डोक्यात वीट मारून जखमी केले. सोमवारी सकाळी सावेडी उपनगरातील पाईपलाईन रोडवर ही घटना घडली. जखमीवर येथील जिल्हा शासकीस रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
उपचारादरम्यान त्यांनी तोफखाना पोलिसांना दिलेल्या जबाबावरून अर्जुन हुशारे (रा. पाईपलाईन रोड, सावेडी) याच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. सोमवारी सकाळी फिर्यादी यांच्या घरासमोर उभी केलेली दुचाकी त्यांच्या मुलीकडील दुचाकीचा धक्का लागल्याने पडली. या कारणातून अर्जुन हुशारे याने तिला शिवीगाळ करून मारहाण केली.
दरम्यान मुलीला मारहाण होत असल्याचे फिर्यादी यांनी पाहताच त्यांनी अर्जुन हुशारे याला जाब विचारला. त्याने त्यांनाही शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. डोक्यात वीट फेकून मारून जखमी केले. जखमी फिर्यादी यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांनी उपचारादरम्यान तोफखाना पोलिसांना दिलेल्या जबाबावरून अर्जुन हुशारे विरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.