बहिण-भावाला शिवीगाळ करत मारहाण

एकाविरूध्द अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल
बहिण-भावाला शिवीगाळ करत मारहाण

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

बहिण-भावाला जातीवाचक शिवीगाळ, मारहाण करून बहिणीचा विनयभंग केल्याची घटना मंगळवारी सकाळी नगर शहरात घडली. याप्रकरणी पीडित युवतीने तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अमीर सलीम शेख (रा. कोठला) याच्याविरूध्द विनयभंग, अ‍ॅट्रोसिटी आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमीर शेख हा पप्पू अँबटच्या प्लॉटची देखरेख करतो. तो मंगळवारी सकाळी फिर्यादीकडे आला व त्यांना म्हणाला,‘पप्पू अँबट यांच्या प्लॉटकरिता असलेल्या कंपाऊडची भिंत कशी काय पाडली, ती तुम्हीच पाडली आहे’, असे म्हणून फिर्यादीला त्याने शिवीगाळ, दमदाटी केली. फिर्यादी यांनी त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न केला असता त्याने जातीवाचक शिवीगाळ केली.

यावेळी फिर्यादी यांचा भाऊ तेथे आला असता अमीरने त्यांना देखील जातीवाचक शिवीगाळ, दमदाटी करत मारहाण केली. भांडण सोडविण्यासाठी फिर्यादी मध्ये आल्या असता अमीरने त्यांचा हात पकडून त्यांच्यासोबत लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस उपअधीक्षक अनिल कातकडे करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com