घरात घुसून महिलेसोबत गैरवर्तन

सात जणांविरूध्द गुन्हा
घरात घुसून महिलेसोबत गैरवर्तन

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

मागील भांडणाच्या कारणावरून महिलेला घरात घुसून शिवीगाळ दमदाटी केली. महिलेचा हात पिरगाळून विनयभंग केल्याप्रकरणी सात जणांविरूध्द शुक्रवारी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 8 सप्टेंबर रोजी मुकुंदनगर येथे ही घटना घडली होती. सुरूवातीला याप्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला होता.

अकील रूस्तुम सय्यद, परवेज अकील सय्यद, रिजवान रूस्तुम सय्यद, अय्युब रूस्तुम सय्यद, हुसेन रूस्तुम सय्यद, आयान व नवेद (पूर्ण नाव माहीत नाही, सर्व रा. जुने मुकुंदनगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पीडित महिला घरी असताना आरोपींनी रात्री पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास घरात घुसून तुमच्या मुलाने माझ्या मुलास का मारले, असे म्हणत शिवीगाळ व दमदाटी केली.

महिलेचा हात पिरागाळून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. लाथाबुक्क्याने मारहाण करून तुम्ही गल्लीत कसे राहता, ते पाहतोच असे म्हणत जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com