सासर्‍याचे सुनेसोबत गैरवर्तन

सासर्‍याचे सुनेसोबत गैरवर्तन

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

सासर्‍याने सुनेसोबत गैरवर्तन केल्याची घटना समोर आली आहे. 2 ऑगस्ट, 2022 रोजी उपनगरात ही घटना घडली असून पीडित सूनेने याबाबत शनिवार, 10 सप्टेंबर,रोजी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दिलेल्या फिर्यादीवरून सासर्‍याविरूध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीचे लग्न 30 डिसेंबर, 2018 रोजी झाले होते. लग्नानंतर फिर्यादी व सासू-सासरे घरात राहत होते. फिर्यादीचे पती नोकरीनिमित्त पुणे येथे राहत असत व ते सोमवार, मंगळवार नगरमध्ये येत होते. पती पुणे येथे असल्याचा गैरफायदा घेत सासर्‍याने 2 ऑगस्ट रोजी फिर्यादीच्या बेडरूममध्ये प्रवेश करून त्यांच्यासोबत लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले.

झालेला प्रकार कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. फिर्यादीने त्यांची आई व चुलत्याला झालेल्या प्रकाराबाबत माहिती दिली. यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com