कट मारल्याच्या कारणातून दोघांना मारहाण

सात जणांविरूद्ध कोतवालीत गुन्हा
कट मारल्याच्या कारणातून दोघांना मारहाण

अहमदनगर |प्रतिनिधी|Ahmednagar

शहरात वार्तांकन करण्यासाठी जात असलेल्या दोन पत्रकारांना सात जणांनी शिवीगाळ, धक्काबुक्की करत मारहाण केली. ही घटना मंगळवारी दुपारी माळीवाडा परिसरात घडली. पत्रकार बाळकृष्ण सांडु अहिरे (वय 36 रा. भूषणनगर, केडगाव), सुनील निमसे असे मारहाण झालेल्या पत्रकारांची नावे आहेत. बाळकृष्ण अहिरे यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून सात जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सय्यद शकील हमीद, सद्दाम शकील सय्यद (दोघे रा. नगर) व त्यांच्या सोबतचे इतर चार ते पाच अनोळखी इसम असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी सय्यद हमीद व सद्दाम सय्यद यांना अटक केली आहे. एका दैनिकात काम करणारे पत्रकार अहिरे व निमसे शहरात वार्तांकन करण्यासाठी दुपारी दुचकीवरून जात असताना समोरून राँग साईडने दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांच्या दुचाकीला कट मारला.

त्यांना समजून सांगण्यासाठी गेलेल्या पत्रकार अहिरे यांना आरोपींनी शिवीगाळ, धक्काबुक्की केली. इतर चार ते पाच इसमांना बोलवून घेत त्यांना मारहाण केली. भांडण सोडविण्यासाठी मध्ये आलेल्या पत्रकार निमसे यांना आरोपींनी शिवीगाळ, धक्क्काबुक्की केली. या घटनेचा पत्रकारांनी निषेध नोंदविला आहे. पोलिसांनी तात्काळ आरोपींना अटक केली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com