अश्लील हावभाव करणाऱ्या महिलांविरुद्ध कारवाई

अश्लील हावभाव करणाऱ्या महिलांविरुद्ध कारवाई

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangmner

शहरातील बाजारपेठेत तसेच खाजगी लॉजमध्ये सुरू असलेल्या बेकायदेशीर वेश्या व्यवसायाबाबत दैनिक सार्वमत मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच शहर पोलीस खडबडून जागे झाले आहेत. शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने काल शहरात फिरून नवघर गल्ली परिसरातील एका लॉज जवळ अश्लील हावभाव करताना आढळल्याने तीन महिलांना व दोन पुरुषांना ताब्यात घेतले आहे.

संगमनेर शहर व परिसरात गेल्या काही महिन्यांपासून वेश्याव्यवसाय बोकळत आहे. शहरातील बाजारपेठेत एका इमारतीमध्ये खुलेआम वेश्या व्यवसाय सुरू आहे. यामुळे परिसरातील व्यापारी त्रस्त झाले असून त्यांनी पोलिसांना याबाबत वेळोवेळी सांगितले आहे. मात्र पोलिसांनी या वेश्याव्यवसायावर कोणतीही कारवाई केली नव्हती. बाजारपेठे बरोबरच शहरातील विविध लॉज मध्ये खुलेआम वेश्या व्यवसाय सुरू आहे. तालुक्याच्या बाहेरील भागातील काही महिला संगमनेरात येऊन वेश्या व्यवसाय करत आहे.

शहरातील बहुतांशी लॉजमध्ये हा व्यवसाय सुरू असतानाही पोलिसांची याकडे दुर्लक्ष झाले आहे. वेश्या व्यवसायामुळे सुसंस्कृत संगमनेर शहराची प्रतिमा डागाळत चालली आहे. शहरात सुरू असलेल्या अवैध वेश्याव्यवसाय बाबत काल दैनिक सार्वमत मध्ये वृत्त प्रसिद्ध करण्यात आले हे वृत्त प्रसिद्ध होताच शहर पोलिसांनी काल शहरात फिरून पाहणी केली.

सहाय्यक पोलीस निरीक्षक व त्यांच्या सहकारी पोलिसांनी संगमनेर मध्ये फेरफटका मारला असता नवघर गल्ली परिसरात काही महिला तोंडाला स्कार्फ बांधून अश्लील हावभाव करत होत्या. पोलिसांनी त्यांची विचारपूस केली मात्र त्या समाधानकारक उत्तरे देऊ शकले नाही यामुळे तीन महिला व दोन पुरुष यांना पोलिस ठाण्यात नेण्यात आले. त्यांच्याविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करून नंतर त्यांना सोडून देण्यात आले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com