खुनाच्या गुन्ह्यात आरोपीला जन्मठेप

खुनाच्या गुन्ह्यात आरोपीला जन्मठेप

श्रीरामपूर | प्रतिनिधी

तालुक्यातील पढेगाव येथे अनैतिक संबंधास अडथळा ठरतो म्हणून लाकडी दांडक्याने मारहाण करुन खून केल्याप्रकरणी श्रीरामपूर न्यायालयाचे न्यायाधिश महमंद नासीर एम. सलीम यांनी आरोपी विशाल प्रदीप तोरणे यास जन्मठेप व 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

तर आरोपी नं. 2 मनिषा पवार हिचेविरुध्द कोणतेही पुरावे मिळून आले नाही म्हणून तिची निर्दोष मुक्तता केली. सरकार पक्षाच्यावतीने सरकारी वकील अ‍ॅड. प्रसन्न गटणे यांनी काम पाहिले.

श्रीरामपूर तालुक्यातील पढेगाव येथे दि. 05/04/2018 रोजी रात्री त्याचा भाऊ विकास इंद्रभान पवार हा त्याची बायको मनिषा विकास पवार ही आरोपी विशाल प्रदिप तोरणे याच्या घरी आहे किंवा काय हे पाहाण्यासाठी गेला. त्यावेळेस विशाल प्रदिप तोरणे व मनिषा विकास पवार या दोघांनी त्यांच्या अनैतिक संबंधास मनिषा हिचा पती विकास पवार हा विरोध करतो म्हणून त्यास लाकडी दांडक्याने जबरदस्त मारहाण करुन त्याचा खून केला.

याप्रकरणी अण्णासाहेब इंद्रभान पवार, रा. पढेगाव यांनी श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी विशाल प्रदिप तोरणे व मनिषा विकास पवार या दोघांविरुध्द भा. दं. वि. कलम 302 सह 34 व आर्मस अ‍ॅक्ट कलम 4/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला व आरोपींना अटक करण्यात आली. त्यानंतर आरोपीविरुद्ध श्रीरामपूर येथील मे. सेशन जज्ज यांचे न्यायालयात दोषारोप 18/2018 या नंबरने दाखल करण्यात आली.

सदर केसकामी सरकारी पक्षातर्फे एकंदर 13 साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. यामध्ये महत्वाचे घटनास्थळ पंच, प्रत्यक्ष दर्शी साक्षीदार, तपासी अधिकारी, फोटो ग्राफर व पोस्टमार्टम करणारे डॉक्टर यांच्या महत्वाच्या साक्षी नोंदविण्यात आल्या.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com