नगर तालुक्यात चोर्‍या करणारे तिघे जेरबंद

११ गुन्ह्याची कबुली, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
नगर तालुक्यात चोर्‍या करणारे तिघे जेरबंद

अहमदनगर|Ahmedagar

जबरी चोर्‍या व इलेक्ट्रिक मोटार चोरी (Robbery and electric Pump theft) करणाऱ्या तीन आरोपींना नगर तालुका पोलिसांनी अटक (accused arrested by Nagar taluka police) केली आहे. दीपक मुरलीधर घायमुक्ते (वय २३), किरण बापू घायमुक्ते (वय ३१ दोघे रा. देऊळगाव ता. नगर), अमोल शहाजी गायकवाड (वय २६ रा. वडगाव तांदळी ता. नगर) अशी अटक केलेल्या आरोपींचे नावे आहेत. या आरोपींनी केलेले ११ गुन्हे उघडकीस (11 crimes open) आले असून सोन्याचे दागिने व आठ इलेक्ट्रिक मोटारी असा एक लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

देऊळगाव सिद्धी (Deulgav Sidhi) येथील काहीजण साथीदारांच्या मदतीने इलेक्ट्रिक मोटार चोरी करून त्या तोडून भंगारमध्ये विक्री करत आहेत, अशी माहिती नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप (Assistant Inspector of Police Rajendra Sanap) यांना मिळाली होती. निरीक्षक सानप यांनी त्यांच्या पोलीस पथकाला दिलेल्या सूचनेनुसार पथकाने देऊळगाव सिद्धी परिसरातून दीपक व किरण घायमुक्ते आणि अमोल गायकवाड यांना पकडले. या तिघांना पोलिसांनी पोलीस खाक्या दाखविताच त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली.

नगर तालुका (Nagar Taluka), भिंगार कॅम्प पोलीस ठाणे हद्दीत (Bhingar Camp Police Station Boundary) ११ दाखल गुन्ह्यांची कबुली देऊन सोन्याचे दागिने व आठ इलेक्ट्रिक मोटार असा एक लाख ५० हजाराचा मुद्देमाल काढून दिला. सदरचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. निरीक्षक सानप यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक डी. आर. जारवाल, पोलीस कर्मचारी शैलेश सरोदे, लगड, योगेश ठाणगे, बाळू कदम, संदीप जाधव, धर्मराज दहीफळे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com