शिर्डीत विवाहित महिलेवर अत्याचार, व्हिडिओ बनवून महिलेला केले ब्लॅकमेल

शिर्डीत विवाहित महिलेवर अत्याचार, व्हिडिओ बनवून महिलेला केले ब्लॅकमेल

शिर्डी | प्रतिनिधी

श्री साईबाबांच्या शिर्डीत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका चाळीस वर्षीय विवाहित महिलेला बळजबरीने तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध केले. ते संबंध करताना त्याचा व्हिडिओ बनवला.

याबाबत कुठे वाच्यता केल्यास जीवे ठार मारण्याची धमकी आरोपीने पीडित महिलेला दिली. याबाबत शिर्डी पोलीस ठाण्यात आरोपी निवृत्ती गोपीनाथ गोंदकर याच्या विरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेने शिर्डीत खळबळ उडाली आहे.

शिर्डीत विवाहित महिलेवर अत्याचार, व्हिडिओ बनवून महिलेला केले ब्लॅकमेल
३० प्रवाशांसह पुण्याला निघालेली खासगी बस पेटली, नगर-पुणे महामार्गावर अग्नितांडव

याबाबत सविस्तर माहिती अशी, आरोपी निवृत्ती गोपीनाथ गोंदकर (वय-50, राहणार- बिरोबा रोड, नवीन बाजार तळ, शिर्डी) याने एका चाळीस वर्षे वयाच्या विवाहित महिलेला बळजबरीने तिच्या इच्छेविरुद्ध अत्याचार करून शरीर संबंध केले. यावरच आरोपी थांबला नाही तर त्याने पीडित महिलेबरोबर अत्याचार करण्याचे मोबाईल मध्ये व्हिडिओ चित्रीकरण केले, धमकी देऊन शिवीगाळ, मारहाण केली व वेळोवेळी बलात्कार केला.

शिर्डीत विवाहित महिलेवर अत्याचार, व्हिडिओ बनवून महिलेला केले ब्लॅकमेल
रोडरोमिओंना पोलिसांचा दणका, १६ जणांविरूध्द कारवाई

पिडीत महिलेने शिर्डी पोलिसांत फिर्याद दिल्यावरून आरोपीविरुद्ध शिर्डी पोलीस ठाण्यात भादवि कलम ३७६ प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून आरोपी निवृत्ती गोंदकर याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील तपास सपोनी.दाभाडे हे करीत आहे. पिडीत महिलाही आरोपीच्या नात्यातील असल्याचे समजते. दरम्यान या घटनेने शिर्डी खळबळ उडाली आहे.

शिर्डीत विवाहित महिलेवर अत्याचार, व्हिडिओ बनवून महिलेला केले ब्लॅकमेल
शेतकरी पशुधनाच्या बाबतीत राज्यसरकार संवेदनशील : महसूलमंत्री विखे
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com