अल्पवयीन मुलीचे अपहरण करणार्‍या महिलेला अटक

नगरमधील मुलीची सुखरूप सुटका: कोतवाली पोलिसांची कामगिरी
अल्पवयीन मुलीचे अपहरण करणार्‍या महिलेला अटक

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शहराच्या एका उपनगरातील अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिला कला केंद्रात वाममार्गाला लावण्याचा प्रयत्न झाल्याचा प्रकार समोर आला आहे. मुलीचे अपहरण करणार्‍या महिलेला जामखेड येथून कोतवाली पोलिसांनी अटक केली आहे. त्या अल्पवयीन मुलीचीही पोलिसांनी सुखरूप सुटका केली आहे. नंदिनी बाळासाहेब काळापहाड (रा. जामखेड) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. न्यायालयाने तीला दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

नगरमधील एका अल्पवयीन मुलीचे जामखेड येथील महिलेने अपहरण केले होते, यासंदर्भात कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल होता. ती मुलगी जामखेड येथे असल्याची माहिती कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांना समजल्यानंतर त्यांनी तात्काळ जामखेड याठिकाणी पोलिसांचे पथक पाठवले होते.

सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन रणदिवे पोलीस अंमलदार गणेश धोत्रे, नकुल टिपरे आदींच्या पथकाने मुलीचे अपहरण करणार्‍या महिलेला अटक करत मुलीची सुटका केली.

Related Stories

No stories found.