गोणेगाव येथे मारहाण व तलवारीने वार; 12 जणांवर गुन्हा दाखल

गोणेगाव येथे मारहाण व तलवारीने वार; 12 जणांवर गुन्हा दाखल

नेवासा |तालुका वार्ताहर| Newasa

नेवासा तालुक्यातील गोणेगाव येथे मागील भांडणाच्या कारणावरुन मारहाण तसेच तलवारीने वार केल्याची घटना घडली असून त्यावरून 12 जणांवर जीवे ठार मारण्याच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत अविनाश विठ्ठल शेटे (वय 35) रा. गोणेगाव ता. नेवासा यांनी फिर्याद दिली असून त्यात म्हटले की, आम्ही आमच्या शेतात गट नंबर 195/3 मध्ये राहतो. माझ्या राहत्या घरी येऊन. मागील भांडणाच्या कारणावरून आमच्या गावातील आरोपी. गणेश वसंत रोडे याने तलवारीने माझ्या मानेवर .जिवे ठार मारण्याचे उद्देशाने वार करण्याच्या प्रयत्नात असताना माझ्या आईने मोठ्याने आवाज दिल्याने तो मानेवरील वार मी शिताफीने हुकवला.

मात्र तेव्हा तो वार गुडघ्यावर पुढील बाजूने लागल्यामुळे मी त्यात गंभीर जखमी झालो. तेव्हा आमच्या घराजवळ आरडा ओरडा ऐकून तेथे रोहीदास मच्छिंद्र रोडे, भाउसाहेब पंढरीनाथ रोडे, संदीप हौशीराम खडे, वैभव भाउसाहेब रोडे, ज्ञानदेव पंढरीनाथ रोडे, रविंद्र ज्ञानदेव रोडे, प्रदीप ज्ञानदेव रोड़े, वसंत मोहन रोडे, संदीप वसंत रोडे, विवेक रोहीदास रोडे व बाबासाहेब गंगाधर ढोकणे तसेच इतर 15 ते 16 अनोळखी इसम माझ्या घरासमोर आले.

तेव्हा रोहीदास मच्छिंद्र रोड़े याने त्याचे हातातील गावठी कट्ट्याने. माझा भाऊ कुलदीप याच्या डोक्यास लावल्याने माझे चुलते विश्वनाथ शेटे, चुलत भाऊ आकाश व सागर भारत शेटे पळत आले. तेव्हा वरील सर्व इसमानी माझे वडील व चुलते तसेच भाऊ यांना खाली पाडून मारहाण करत असताना याबाबत नगर कट्रोल येथे कळविले असता. नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल होताच आरोपींनी अंधाराचा फायदा घेवून शेजारील उसात पळून गेले.

जखमी झाल्याने मी अहमदनगर येथे आनंद ऋषी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल होतो. त्यानंतर मला बरे वाटत असल्याने आरोपी विरुद्ध फिर्याद देण्यासाठी हजर झालो. अशी फिर्याद अविनाश विठ्ठल शेटे यांनी नेवासा पोलीस ठाण्यात दिल्यावरून गणेश वसंत रोडे, रोहीदास मच्छिंद्र रोडे, भाउसाहेब पंढरीनाथ रोडे, संदीप हौशीराम खडे, वैभव भाउसाहेब रोडे, ज्ञानदेव पंढरीनाथ रोडे, रविंद्र ज्ञानदेव रोडे, प्रदीप ज्ञानदेव रोड़े, वसंत मोहन रोडे. संदीप वसंत रोडे, विवेक रोहीदास रोडे व बाबासाहेब गंगाधर ढोकणे सह 15 ते 16 अनोळखी आरोपीवर भारतीय दंड विधान कलम. 307, 326, 324, 323, 504, 506, 143, 147, 148, 149, 188, 269, 270, महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 नुसार कायदा कलम 37 (1), 37 (3), 135, शस्त्र अधिनियमन 1959 नुसार कायदा कलम 3, 25, 4 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपन्थिक्षक श्री. ठाकूर करत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com