कोळगावात महिलेकडून दारू विक्री

कोळगावात महिलेकडून दारू विक्री

पोलिसांच्या छाप्यात 96 हजाराची दारू जप्त

श्रीगोंदा (तालुका प्रतिनिधी) - कोळगाव शिवारातील कावेरी हॉटेलच्या मागे पत्र्याच्या शेडमध्ये साठवलेला देशी- विदेशी दारूचा साठा बेलवंडी पोलिसांच्या पथकाने पकडला. दारू विक्रीचा परवाना नसताना तब्बल 96 हजार रूपये किंमतीचा दारूसाठा करण्यात आला होता. पोलिसांनी सर्व दारू जप्त केली आहे.

नगर- दौंड रोडवरील कोळगाव शिवारात कावेरी हॉटेलच्या पाठीमागे दारूचा साठा करून त्याची विक्री केली जात असल्याची माहिती बेलवंडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक संपत शिंदे यांना मिळाली होती.

निरीक्षक शिंदे यांच्यासह पोलीस कर्मचारी संतोष गोमासाळे, हसन शेख, ज्ञानेश्‍वर पठारे, दिवटे, भाऊसाहेब शिंदे, रावसाहेब शिंदे, जाधव, विद्या धावडे यांच्या पथकाने छापा टाकला असता दारू साठा मिळून आला. दारू विक्री करणार्‍या रोहिणी सतिष घोडंगे (रा. कोळगाव ता. श्रीगोंदा) या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले असून तिच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com