राहुरी (प्रतिनिधी) -

जाण्या येण्याच्या रस्त्यावर काचा का टाकल्या? असे विचारल्याचा राग आल्याने मंगल गागरे यांना काठी व दगडाने मारहाण केल्याची

घटना राहुरी तालुक्यातील कणगर येथे घडली. याबाबत राहुरी पोलिसांत चारजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सायंकाळी सहा वाजे दरम्यान मंगल गागरे यांच्या कणगर शिवारातील शेतात जाण्या-येण्याच्या रस्त्यावर यातील आरोपींनी काचा टाकल्या होत्या. मंगल गागरे यांनी आरोपींना विचारले, तुम्ही रोडवर काचा का टाकल्या? आम्हाला शेतात जाण्यास त्रास होतो. असे म्हणाल्याचा राग आल्याने आरोपींनी संगनमत करून मंगल गागरे यांना काठी व दगडाने मारहाण केली. त्यांच्या मुलीला शिवीगाळ, दमदाटी केली. या घटनेत मंगल गागरे या जखमी झाल्या होत्या. काहीजणांनी त्यांना तातडीने लोणी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

रुग्णालयाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर आरोपी अनिल साहेबराव गाडे, कल्पना अनिल गाडे, वंदना डुकरे व लक्ष्मीबाई गाडे सर्व रा. कानडगाव, ता. राहुरी या चारजणांवर राहुरी पोलिसांत मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेनंतर आरोपी पसार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.