अण्णांची बदनामी; संपादक गोत्यात, गुन्हा दाखल

अण्णांची बदनामी; संपादक गोत्यात, गुन्हा दाखल
अण्णा हजारे

पारनेर | प्रतिनिधी

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Social Activist Anna Hazare) यांच्या तोंडी शिक्षकांविषयी (Teachers) अनुदार उद्गार घालून खोटी बातमी (Fakenews) देणाऱ्या औरंगाबाद (Aurangabaad) येथील एका वृत्त पत्राचा संपादक रविंद्र तहकिक याच्या विरुद्ध पारनेर पोलिस ठाण्यात (Parner Police Station) काल रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अहमदनगर जिल्हा कला शिक्षक संघाचे (Ahmednagar District Art Teachers Association) अध्यक्ष संजय पठाडे यांनी हा गुन्हा दाखल केला असून भारतीय दंड विधान चे कलम १५३ अ (१)(ब)(क) तसेच ५०४, ५०४(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कलमांतर्गत आरोपीला ३ वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते.

निराधार वृत्त छापून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची बदनामी करणे, शिक्षक वर्गाला ज्येष्ठ समाजसेवकाच्या विरोधात चिथावणी देणे आणि शिक्षक वर्ग व अण्णा समर्थक अशा दोन समुदायात तेढ निर्माण होईल असे कृत्य करून सामाजिक शांततेचा भंग करण्याचा प्रयत्न करणे अशा आरोपांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील व उपअधीक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घनश्याम बाळप हे पुढील तपास करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com