चाकू बाळगणार्‍या युवकावर गुन्हा दाखल
सार्वमत

चाकू बाळगणार्‍या युवकावर गुन्हा दाखल

भिंगार पोलिसांची कारवाई

Sachin Daspute

Sachin Daspute

अहमदनगर | प्रतिनिधी | Ahmedanagar

भिंगार परिसरातील सारसनगर भागात मदरसा समोर विनापरवाना चाकू घेऊन फिरणार्‍या एका युवकाला भिंगार पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून एक चाकू हस्तगत केला असून त्याच्याविरोधात भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस हवालदार गोपीनाथ गोर्डे यांनी फिर्याद दिली आहे. करण ईश्वर कचरे (वय- 19 रा. सारसनगर, भिंगार) असे या युवकाचे नाव आहे.

सारसनगर परिसरात एक युवक एका बाजुने धार व एका बाजुने दातरे असलेला मोठा चाकू घेऊन फिरत असल्याची माहिती भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील यांना मिळाली होती. त्यानुसार निरीक्षक पाटील यांनी सारसनगरमधील मदरसा परिसरात कानडे मळा जाणार्‍या रोडवर करण कचरे या युवकाला ताब्यात घेतले. पंचासमक्ष त्याची झडती घेतली असता एक चाकू मिळून आला. पोलिसांनी तो जप्त केला आहे. याप्रकरणी कचरे याच्याविरूद्ध भारतीय हत्यार कायदा कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. अजून या युवकाकडे काही हत्यारे आहे का? याचा तपास पोलीस हवालदार नगरे करीत आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com