तीन तरूणांवर कोयत्याने जीवघेणा हल्ला

नगरच्या 'या' भागात घडली घटना
तीन तरूणांवर कोयत्याने जीवघेणा हल्ला

अहमदनगर | Ahmedagar

तीन तरूणांवर कोयत्यांनी हल्ला करत त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न झाला. या हल्ल्यात सिद्धार्थ ऊर्फ दाद्या रावसाहेब शिंदे व त्यांचे मित्र किरण रवी सोनवणे, सागर दिलीप गायकवाड (रा. निंबळक ता. नगर) हे तिघे जखमी झाले आहेत.

नागापूर एमआयडीसीतील ड्रिलको कंपनी परिसरात ही घटना घडली. या प्रकरणी सिद्धार्थ शिंदे यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पाच जणांविरोधात खूनाचा प्रयत्न कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

जॉय त्रिभुवन, आनेश ऊर्फ अनिस ऊर्फ अण्णा बाळू पवार, सुमित बाबासाहेब थोरात (तिघे रा. गजानन कॉलनी), लपक्या ऊर्फ अनिकेत सोमवंशी (रा. चेतना कॉलनी) व एक अनोळखी इसम असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. आरोपी ड्रिलको कंपनी परिसरात गांजा ओढत असताना त्या ठिकाणी सिद्धार्थ शिंदे हे त्यांचा मित्र अक्षय सानप यांना शोधण्यासाठी गेले होते. यावेळी आनेश पवार याने शिंदे यांच्या तोंडात मारली. त्यानंतर शिंदे हे त्यांचे मित्र सागर गायकवाड, अजय गुळवे, प्रशांत पवार, किरण सोनवेण यांना मिटवा मिटवी करण्यासाठी ड्रिलको कंपनी परिसरात घेऊन गेले. त्याठिकाणी असलेल्या आनेश पवार याने किरण सोनवणे यांच्यावर कोयत्याने हल्ला केला. यावेळी शिंदे यांनी पवार याच्या हातातून कोयता ओढण्याचा प्रयत्न केला असता पवार याने शिंदेवर हल्ला करून त्यांना जखमी केले. लपक्या सोमवंशी याने त्याच्याकडील कोयत्याने सागर गायकवाड यांच्यावर हल्ला केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com