नेवासा शहरात दोन गटांत हाणामारी

परस्परविरोधी फिर्यादीवरून दोन्ही बाजूच्या 18 जणांवर जीवे ठार मारण्याच्या प्रयत्नांसह दंगलीचे गुन्हे दाखल
नेवासा शहरात दोन गटांत हाणामारी

नेवासा |तालुका वार्ताहर| Newasa

आधी झालेल्या वादाच्या कारणावरून (reasons of contention) नेवासा (Newasa) येथे रविवारी सायंकाळी दोन गटांत हाणामारीची घटना (Two group Fight) घडली असून याबाबत दाखल परस्परविरोधी फिर्यादींवरून दोन्ही बाजूच्या 18 जणांवर जीवे ठार मारण्याच्या प्रयत्नांसह दंगल व अन्य गुन्हे दाखल झाले आहेेत.

अरबाज मुक्तार चव्हाण (वय 19) रा. लक्ष्मीनगर नेवासा खुर्द (Newasa Khurd) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, रस्त्याचे काम चालू असताना रोडवर टाकलेल्या काट्या का काढल्या, असे विचारले असता वाद घातला. त्यानंतर रविवारी सायंकाळी सात वाजता नेवासा येथील एका हॉटेलात चहा पित असताना तिथे सलीम मस्जिद शेख याने तुझ्या वडिलांनी दमदाटी का केली? असे म्हणून त्याच्यासह मनोज लष्करे, स्वप्नील म्हस्के या तिघांनी शिवीगाळ व दमदाटी केली. त्यानंतर घरी गेलो असता पाठोपाठ तिघांबरोबरच आणखी चौघे रामदास ईरले, अनिल ईरले, पप्या शेळके, यश गलाटे, एक महिला व अन्य पाच अनोळखी इसम आले. त्यांनी शिवीगाळ का केली? असे म्हणून मला व घरातील लोकांना ठार मारण्याच्या उद्देशाने दगड व लाथाबुक्क्यांनी मारहाण (Beating)केली.

या फिर्यादीवरून नेवासा पोलिसांनी गुन्हा रजिस्टर फर्स्ट 478/2021 भारतीय दंड विधान कलम 307, 323, 504, 506, 143, 144, 147, 148, 149 आदी कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

दुसरी फिर्याद सलीम मज्जीद शेख (वय 24) यांनी दिली असून त्यावरून शाहरुख अक्तर पठाण, साहिल मजीद शेख, तोसीफ अब्बास शेख, सद्दाम बबलू सय्यद, जुनेद मुक्तार पठाण, अरबाज मुक्तार पठाण, अजिज अक्तार पठाण, मुक्तार पठाण व एक महिला या दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. फिर्यादीत म्हटले की, रविवारी सायंकाळी फिर्यादी चहा पिण्यासाठी गावात जात असताना शफिक इनामदार यांचे दुकानाजवळ साहिल शेख याने धक्का मारून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. फिर्यादी यास जीवे मारण्याच्या (try Killed) उद्देशाने तिथे पडलेला दगड उचलून फिर्यादीचे डोक्यात घातला. फिर्यादीने हा दगड चुकवल्याने सलमान पठाण व अजिज पठाण यांनी मारहाण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न (Try a Killed) केला. या फिर्यादीवरून नेवासा पोलिसांनी (Newasa Police) गुन्हा रजिस्टर फर्स्ट 479/2021 भारतीय दंड विधान कलम 307, 323, 504, 506, 143, 144, 147, 148, 149 आदी कलमान्वये गुन्हा दाखल (action) केला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com