पतसंस्थेच्या सहकर्जदारास तीन महिने शिक्षा

शिक्षा
शिक्षा

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर शहरातील गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी नागरी सहकारी पतसंस्थेमधून कर्ज काढणार्‍या एका सहकर्जदाराने कर्जाची रक्कम फेडली नाही. दिलेला धनादेशही वटवला नाही म्हणून दुसरे सत्र न्यायालयाचे न्यायाधीश श्री. खराडे यांनी तीन महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच धनादेश रकमेच्या दुप्पट दंड ठोठावला असून सदरचा दंड अपील काळ संपल्यानंतर नुकसान भरपाई म्हणून फिर्यादीस देण्याचा हुकूम केला आहे.

कर्जदार ज्ञानेश्वर मारुती लाड व सह कर्जदार सुविध अरुण भोसले यांनी दि.1 जून 2011 रोजी कर्ज घेतले होते. सदर कर्जाची त्यांनी परतफेड केली नाही त्यामुळे पतसंस्थेने त्यांचेकडे थकीत कर्जाची मागणी केली असता सहकर्जदार यांनी पतसंस्थेला कर्ज रक्कम परत करण्यासाठी त्यांच्या बँक खात्याचा धनादेश दिला; परंतु सदरचा धनादेश न वटल्याने संस्थेने अ‍ॅड. व्ही. एन. ताके पाटील यांच्या मार्फत श्रीरामपूर न्यायालयामध्ये सहकर्जदार भोसलेंविरुद्ध एनआय-सीटी 138 अन्वये खटला दाखल केला.

नमूद खटल्यामध्ये संस्थेच्यावतीने दिलेली साक्ष कागदपत्रान्वये महत्त्वपूर्ण ठरल्याने गुन्हा सिद्ध झाला व त्यामुळे आरोपीस दुसरे ज्युडी. न्यायाधीश एन. के. खराडे (वर्ग 1) यांनी तीन महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच धनादेश रकमेच्या दुप्पट दंड ठोठावला असून सदरचा दंड अपील काळ संपल्यानंतर नुकसान भरपाई म्हणून फिर्यादीस देण्याचा हुकूम केला आहे. या खटल्यात पतसंस्थेच्यावतीने अ‍ॅड. व्ही. एन. ताके पाटील यांनी काम पाहिले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com