अहमदनगर (प्रतिनिधी) -

सिमेंट, स्टील भाववाढीचा निषेध म्हणून बिल्डर, आर्किटेक्ट, इंजिनिअर आणि सर्व्हेअर संघटना तसेच क्रेडाई यांचं उद्या धरणे

आंदोलन होत आहे. नगरमधील नव्या कलेक्टर ऑफीससमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती जवाहर मुथा यांनी दिली. नव्या कलेक्टरसमोर हे पहिलचं आंदोलन होत आहे.

मागील काही दिवसांपासून स्टील व सिमेंटच्या दरामध्ये सातत्याने दरवाढ होत आहे. सिमेंट जवळपास 25 टक्के तर स्टिल 50 टक्के महाग झाले आहे.

नगरमध्ये काम करणार्या आर्किटेक्स् इंजिनिअर्स अॅण्ड सर्वेअर्स असा, क्रेडाई आणि बिल्डर्स असो.ऑफ इंडिया, अहमदनगर सेंटर वतीने या दरवाढीचा निषेध करत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. संपूर्ण देशात एकाच वेळी हे आंदोलन होणार आहे.\तीनही संघटनांचे नगरमध्ये 2000 पेक्षा जास्त इंजिनिअर्स, बिल्डर्स बांधकाम व्यवसाय करत असून या सातत्याने होणार्या दरवाढीने हा व्यवसाय धोक्यात आला आहे. या दरवाढीला आळा घालण्यासाठी व संस्थेच्या या मागण्या शासन दरबारी पोहोचण्यासाठी, तसेच सर्वसामान्यांना दर कमी झाल्यावर बांधकाम करणे शक्य होण्यासाठी सदर धरणे आंदोलन करण्याचा मानस आहे.

धरणे आंदोलनाच्या नियोजनासाठी झालेल्या बैठकीस अन्वर सरदार शेख, प्रदीप मधुकर तांदळे, अनिल कोठारी, जवाहर मुथा, मच्छिंद्र पागिरे, मनोज गुंदेचा, विजयकुमार पादीर आदी तिन्ही संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.