भाकप, माकप, किसान सभेकडून तहसिल कार्यालयासमोर सोयाबीन ओतून केंद्र सरकाराचा निषेध

भाकप, माकप, किसान सभेकडून तहसिल कार्यालयासमोर सोयाबीन ओतून केंद्र सरकाराचा निषेध

अकोले |प्रतिनिधी| Akole

सोयाबीन (Soybeans) प्रश्नी किसान सभा (Kisan Sabha) राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले (Dr. Ajit Navale), भाकपचे ज्येष्ठ नेते कॉ. कारभारी उगले (Karbhari Ugale) यांच्या उपस्थितीत अकोले तहसील कार्यालयावर (Akole Tahsil Office) विविध डाव्या विचारांच्या संघटनानी एकत्र येत मोर्चा काढला. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत सोयाबीन (Soybeans) तहसील कार्यालयासमोर (Tahsil Office) ओतून केंद्र सरकाने घेतलेल्या सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांच्या विरोधातल्या भूमिकेचा निषेध व्यक्त (Protested) करण्यात आला.

सोयाबीनचे दर (Soybeans) 11 हजार 111 रुपयांवरून कोसळून केवळ 20 दिवसांमध्ये 4000 रुपयांपर्यंत खाली आल्यामुळे सोयाबीन उत्पादक (Soybean Growers) शेतकरी चिंतेने सापडले आहेत. केंद्र सरकारने (Central Government) सोयाबीनच्या हंगामाच्या तोंडावर 12 लाख टन जी. एम. सोया पेंड आयात करण्याचा निर्णय घेतल्यामुळे सोयाबीनच्या दराची घसरण झाली. केंद्र सरकारच्या या निर्णयाचा भारतीय कम्युनिस्ट पक्ष (Communist Party of India), मार्कसवादी कम्युनिस्ट पक्ष (Marxist Communist Party), किसान सभे सह (Kisan Sabha) विविध संघटनानी एकत्र येत जोरदार निषेध (Protested) केला आहे.

केंद्र सरकारने 12 लाख टन सोयाबीनची आयात तातडीने थांबवावी (Imports of soybeans should be stopped immediately), सोयाबीन उत्पादकांना न्याय द्यावा, ही प्रमुख मागणी या मोर्चात करण्यात आली. तीन काळे कायदे रद्द करावे. यासह इतर मागण्या घेऊन किसान सभेच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा (Tahsil Office Morcha) काढण्यात आला. किसान सभा राज्य सरचिटणीस अजित नवले (Ajit Navale), भाकपचे ज्येष्ठ नेते कॉ. कारभारी उगले (Karbhari Navale) आदींची यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात भाषणे झाली.

Related Stories

No stories found.