ऐन दिवाळीत ठकसेनाचा शेतकऱ्यांना लाखोंचा चुना

ऐन दिवाळीत ठकसेनाचा शेतकऱ्यांना लाखोंचा चुना

पिंपरी निर्मळ | वार्ताहर

उधारीमध्ये गायी विकत घेवुन एका व्यापाऱ्याने पळ काढल्याने राहाता तालुक्यातील पिंपरी निर्मळ येथील शेतकऱ्यांना जवळपास चौदा लाखाच्यावर फटका बसला आहे.

अदयाप याबाबद पोलिसात तक्रार दाखल झालेली नसुन ऐन दिवाळीत शेतकऱ्यांन अनेकांच्या दिवाळीच्या उत्साहावर विरंजन पडले आहे.

पिंपरी निर्मळ गाव जिरायती असल्याने प्रंपचाला चालविण्यासाठी शेतकऱ्यांना दुग्ध व्यावसायाचा मोठा अधार आहे. त्यातच शेतकऱ्यांना फसविणाऱ्यांची संख्याही वाढत आहे.

परीसरातील एका गाईच्या व्यापाऱ्याने गावातील जवळपास सोळा शेतकऱ्यांकडुन बारा लाखांच्या गाई उधार नेल्या. गाई विकल्यानंतर तुमचे पैसे घरपोहच करतो अशी बतावणी करून शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केला.

गाई नेल्यानंतर त्या व्यापाऱ्याचा मोबाईलही बंद येत असुन त्याचा थांगपत्ताही सापडेनासा झाला आहे. चार पाचशे रूपये कमीशनसाठी गाई दाखविणारे गावातील आडते मात्र तोंडावर पडले आहेत.

अदयाप पोलिसांमध्ये याबाबद कोणतीच फिर्याद दाखल झालेली नाही. मात्र ऐन दिवाळीच्या उत्साहाच्या वातावरणात ठकसेनाने चुना लावल्याने या शेतकऱ्यांच्या व कुटुंबियांच्या आनंदावर विरंजन पडले आहे.

Related Stories

No stories found.