शहरात होणार्‍या गोवंश हत्येबाबत मुस्लिम समाजातील नेत्यांनी लक्ष घालावे - वहाडणे

शहरात होणार्‍या गोवंश हत्येबाबत मुस्लिम 
समाजातील नेत्यांनी लक्ष घालावे - वहाडणे
नगराध्यक्ष वहाडणे

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

शहरातील संजयनगर, सुभाषनगर, बैलबाजार रोड भागात सातत्याने गोवंश हत्त्या (Cow slaughter) चालू आहे. बंदी असूनही दिवस रात्र गोवंश हत्या दिवसाढवळ्या होत आहे. यात मुस्लिम नेत्यांनी (Muslim leaders) लक्ष घालावे, अन्यथा शहरातील कायदा व्यवस्था बिघडू शकते, असा इशारा (Hint) वजा सल्ला नगराध्यक्ष विजय वहाडणे (Mayor Vijay Vahadane) यांनी दिला आहे.

नगराध्यक्ष वहाडणे (Mayor Vijay Vahadane) म्हणाले, रात्रंदिवस काही घरात सर्रासपणे गायींची कत्तल होऊन नाल्यात रक्त मांस वाहत असते. त्यामुळे हजारो नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेले दिसते. शहराचे आरोग्य बिघडू नये म्हणून कोपरगाव नगरपरिषदेने (Kopargaon Municipal Council) जवळजवळ 1 कोटी खर्च करून मनाई येथे आधुनिक मशिनरी बसवून अधिकृत कत्तलखाना (Slaughterhouse) (स्लॉटर हाऊस) उभारून दिले आहे. तेथे म्हैसवर्गीय प्राण्यांची नियमानुसार कत्तल करण्याची परवानगी आहे. असे असतानाही काही खाटिक भरवस्तीत गोवंश हत्या करून कायदे धाब्यावर बसवतात. शहरात राहणार्‍या हिंदू समाजाच्या भावनांची जराही दखल न घेता गोहत्या सुरूच आहे.

काही वर्षांपूर्वी याच भागात गोहत्या करणार्‍या कसायांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या नगरपरिषद (Municipal Council) कर्मचार्‍यांवर कसायांनी दगडफेक करून घंटागाड्यांची तोडफोड करून दहशत माजविली होती. प्रशासनाने अनेकदा कारवाया करूनही या आडदांड प्रवृत्तीच्या लोकांना काहीच फरक पडत नाही. तीन वर्षांपूर्वी महाशिवरात्रीच्या दिवशी शासनाने याच भागांत शेकडो जनावरे व कित्येक टन गोमांस जप्त केले. त्यावेळी कोपरगावातील (Kopargav) हिंदुनी समजूतदारपणा दाखवून शहरातील वातावरण बिघडू दिले नव्हते. माझे मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित लोकांना आवाहन आहे, तुम्ही गोवंश हत्त्या करणार्‍याना समजावून सांगा.

तुम्ही जर हिंदूंच्या भावनांची दखल घेतली नाही तर एखाद्या दिवशी तरी या बेकायदेशीर गोहत्यांमुळे शहरातील वातावरण बिघडू शकते. शहरात हिंदू-मुस्लिम समाजात कुठलाही तणाव नाही. शहरातील वातावरण बिघडू नये यासाठी संबंधितांनी-सर्वांनीच काळजी घेणे गरजेचे आहे. कायदे नियम न पाळता गोवंशहत्या करणार्‍यांना वठणीवर आणले पाहिजे. अन्यथा हिच प्रवृत्ती शहरातील वातावरण, कायदा सुव्यवस्था धोक्यात आणल्याशिवाय रहाणार नाही. याची सर्वांनीच दखल घ्यावी, असे आवाहन नगराध्यक्ष वहाडणे यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.