१५ ते १८ वयोगटासाठी उद्यापासून लस; यंत्रणा सज्ज, शाळाबाह्य मुलांनाही डोस

कशी कराल नोंदणी? कोणती लस देणार?
१५ ते १८ वयोगटासाठी उद्यापासून लस; यंत्रणा सज्ज, शाळाबाह्य मुलांनाही डोस

अहमदनगर (प्रतिनिधी)

जिल्ह्यात १५ ते १८ वयोगटातील मुलांचे सोमवारपासून (दि. ३) करोना प्रतिबंधक लसीकरण सुरुवात केली जाणार आहे. तसेच आरोग्य कर्मचारी, फ्रन्टलाइन वर्कर, ६० वर्षावरील व्यक्ती व सहव्याधी असलेल्यांना यांना १० जानेवारीपासून लसीचा तिसरा डोस (प्रीकॉशन डोस) दिला जाणार आहे. मात्र, त्यासाठी त्यांनी लसीचा दुसरा डोस घेऊन ९ महिने किंवा ३९ आठवडे पूर्ण असणे बंधनकारक करण्यात आले आहे.

१५ ते १८ वयोगटासाठी उद्यापासून लस; यंत्रणा सज्ज, शाळाबाह्य मुलांनाही डोस
Child Vaccination : आजपासून मुलांच्या लसीकरणाची नोंदणी; कशी कराल नोंदणी? कोणती लस देणार?

राष्ट्रीय स्तरावरून मिळालेले मिळालेल्या लसीकरणास १६ जानेवारी २०२१ निर्देशानुसार जिल्ह्यात करोना प्रतिबंधक पासून सुरुवात झाली होती. जिल्ह्यात आत्तापर्यंत उद्दिष्टापैकी २८ लाख ५४ हजार ९५६ लोकांनी (७९ टक्के) तर १७ लाख ९ हजार ५५५ (४७ टक्के) लोकांनी लसचे दोन्ही डोस पूर्ण केलेले आहेत. मात्र, ओमिक्रोन व्हेरिएंटमुळे राष्ट्रीय स्तरावरून १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण करण्याची तसेच आरोग्य कर्मचारी, फ्रन्टलाइन वर्कर, ६० वर्षावरील व सहव्याधी असणाऱ्यांना तिसरा डोस (प्रिकॉशन डोस) देण्याची सूचना देण्यात आली आहे. त्यानुसार १५ ते १८ वयोगटातील मुलांचे ३ जानेवारीपासून लसीकरण सुरू केले जाणार आहे. त्यांच्या लसीकरणासाठी केवळ कोव्हॅक्सिन लसीचा वापर केला जाणार आहे.

१५ ते १८ वयोगटासाठी उद्यापासून लस; यंत्रणा सज्ज, शाळाबाह्य मुलांनाही डोस
Indian Navy Day : छत्रपती शिवाजी महाराजांना 'फादर ऑफ इंडियन नेव्ही' का म्हणतात?

आरोग्य कर्मचारी, फ्रन्टलाइन वर्कर, यांनी दोन्ही डोस घेतली असेल व दुसरा डोस घेऊन ९ महिने किंवा ३९ आठवडे ९ पूर्ण झाले असतील अशांना १० जानेवारीपासून तिसरा डोस (प्रिकॉशन डोस) देण्यात येणार आहे. ६० वर्षावरील व सहव्याधी असलेल्या व्यक्तींना त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरच्या सल्ल्याने १० जानेवारीपासून तिसरा डोस (प्रिकॉशन डोस) दिला जाणार आहे. तिसरी डोस देताना संबंधित लाभार्थ्याने दुसऱ्या डोसच्या तारखेपासून ९ महिने किंवा ३९ आठवडे पूर्ण झालेले असावेत. ६० वर्षावरील व सहव्याधी असलेल्या व्यक्तींना तिसरा डोस देताना लसीकरण केंद्राच्या ठिकाणी कोणतेही प्रमाणपत्र जमा करण्याचे किंवा दाखवण्याची आवश्यकता नाही. फक्त अशा व्यक्तींनी त्यांच्या डॉक्टरच्या सल्ल्याने लसीकरणाबाबत निर्णय घ्यायचा आहे. या लसीकरणासाठी तयारी पूर्ण करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागातून देण्यात आली.

१५ ते १८ वयोगटासाठी उद्यापासून लस; यंत्रणा सज्ज, शाळाबाह्य मुलांनाही डोस
सोशल मीडियावर सनी लिओनीच्या अटकेची का होतेय मागणी?

ग्रामीणसाठी लस रवाना

ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या ९८ प्राथमिक आरोग्य केंद्रातून १५ ते १८ वयोगटातील मुलांना करोना प्रतिबंधात्मक लस देण्यात येणार आहे. यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या लोकसंख्येच्या २५ टक्के प्रमाणात लसींचा पुरवठा करण्यात आला आहे. साधारणपणे प्रत्येक आरोग्य केंद्रात ३०० ते ४०० लसींचे डोस शनिवारीच रवाना करण्यात आले आहेत. शुक्रवारी याबाबत जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र क्षीरसागर यांनी तालुकास्तारावरील आरोग्य कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना सुचना दिल्या आहे. तसेच मेडिकल ऑफीस यांचे १५ ते १८ वर्षांच्या मुलांच्या लसीकरणासाठी प्रशिक्षण घेण्यात आले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे यांनी दिली.

१५ ते १८ वयोगटासाठी उद्यापासून लस; यंत्रणा सज्ज, शाळाबाह्य मुलांनाही डोस
PHOTO : अंकिता लोखंडेचा मराठमोळा साज; नऊवारीत सौंदर्य दिसतय खुलून

२ लाख ३८ हजार उद्दिष्ट

१५ ते १८ वयोगटातील लाभार्थी सन २००७ किंवा त्यापूर्वी जन्म वर्ष असलेला पात्र राहील. या लाभार्थ्यांना कोविन सिस्टिमवर स्वतःच्या मोबाईल क्रमांकाद्वारे लसीकरणासाठी नोंदणी करता येईल. ही ऑनलाईन सुविधा १ जानेवारीपासून सुरू झाली आहे. लसीकरण केंद्राच्या ठिकाणी जाऊन नोंदणीची सुविधाही उपलब्ध आहे. या वयोगटासाठी स्वतंत्र लसीकरण केंद्र निश्चित केले जाणार आहे. या केंद्रावर फक्त कोव्हॅक्सिन उपलब्ध असेल. ज्या ठिकाणी स्वतंत्र केंद्र सुरू करणे शक्य नाही तेथे या वयोगटासाठी स्वतंत्र रांग असेल. शहरात १५ ते १८ वयोगटातील २ लाख ३८ हजार लसीकरणाचे उद्दीष्ट आहे. या गटातील मुले तसेच शाळा व महाविद्यालयातून शिक्षण घेणारे तसेच शाळाबाह्य मुलांचेही लसीकरण केले जाणार आहे.

१५ ते १८ वयोगटासाठी उद्यापासून लस; यंत्रणा सज्ज, शाळाबाह्य मुलांनाही डोस
भाग्यश्रीच्या मनमोहक अदांची चाहत्यांना पडली भुरळ, पाहा फोटो

बुस्टर डोससाठी ऑनलाईन नोंदणी

बुस्टर म्हणजेच तिसरा डोस घेणाऱ्या लाभार्थ्यांसाठी कोविन अॅपमध्येही नोंदणीची सुविधा देण्यात आली आहे. आरोग्य कर्मचारी, फ्रन्टलाइन वर्कर, ६० वर्षे व त्यावरील सहव्याधी असलेल्या नागरिकांना त्यांच्या कोविन अकाऊंटवरून तिसऱ्या मात्रेसाठी नोंदणी करता येईल. तसेच तिसरा डोस घेतल्यानंतर कोविन प्रणालीमधून प्रमाणपत्रही मिळवता येणार आहे.

१५ ते १८ वयोगटासाठी उद्यापासून लस; यंत्रणा सज्ज, शाळाबाह्य मुलांनाही डोस
विशाल निकम ठरला Bigg Boss Marathi 3 चा विजेता, जाणून त्याच्याविषयी...

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com